अॅपल कंपनीने तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल केला आहे. मागील काही दिवसांत तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक चांगले फिचर्सही सादर केले आहेत. आता पुन्हा एक दमदार फिचर अॅपलसोबत जुडणार आहे. 9to5Mac च्या रिपोर्टनुसार अॅपल फेस-आयडी आणि टच-आयडीद्वारे कार अनलॉक करण्यासाठी बायोमॅट्रीक ऑथेंटीकेशनच्या मदतीने नव्या फिचरवर काम करत आहे. बायोमॅट्रीक फिचर्समदतीने ग्राहक फेस-आयडीने आपली कार सुरक्षित ठेवू शकतात.

गतवर्षी ह्य़ुंदाई कंपनीने कार अनलॉक करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करण्याची सुविधा ग्राहकांना दिली होती, आता त्याच धरतीवर अॅपल मॅकेनिझमवर काम करत आहे. लवकरच ग्राहकांसाठी बायोमॅट्रीक ऑथेंटीकेशनद्नारे कार अनलॉक करता येणार आहे. आयफोन एक्सप्रमाणे फेस-आयडी काम कार अनलॉक करण्यासाठी काम करू शकते. लँडस्केप आणि पोटेर्र्ट या दोन्ही मोडमध्ये फेस आयडीचा वापर करता येणार आहे. अर्थात, यात टच आयडी या फिचरचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय, यात डाटा ट्रान्सफर आणि चार्जींगसाठी युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात येणार आहे. कारमध्ये याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील चर्चेनुसार, अॅपल कंपनीने यासाठी पेटंटची नोंदणी केली आहे. ‘सिस्टम अॅण्ड मेथड फॉर व्हेईकल ऑथराइजेशन’ असे त्या पेटंटचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०१७मध्ये अॅपल कंपनीने याची नोंदणी केली आहे. मोबाइल बायोमॅट्रीक ऑथेंटीकेशनल तंत्रज्ञानाद्वारे फेसआयडीच्या माध्यमातून कार अनलॉक करता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.