News Flash

Apple Watch Series 6 लाँच; ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर फिचरचाही समावेश

जाणून घ्या किती आहे किंमत

फोटो सौजन्य - Apple event

अ‍ॅपलनं आपले दोन नवे अ‍ॅपल वॉच सीरिज ६ आणि अ‍ॅपल वॉच सीरिज एसई लाँच केले. अ‍ॅपल वॉच एसईमध्ये ग्राहकांसाठी चांगले फीचर्स देण्यात आले असून यात लहान मुलांसाठीही निराळे फीचर्स देण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. तर दुसरीकडे कंपनीनं लाँच केलेल्या अ‍ॅपल वॉच ६ मध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटरचं फीचरही देण्यात आलं आहे. करोना महामारीदरम्यान ब्लड ऑक्सिजन फीचर टेस्ट करण्याची सर्वाधिक गरज असते.

अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये कंपनीनं एलिव्हेशन ट्रॅकिंग हे फीचरही दिलं आहे. आपण किती उंचीवर आहोत हेदेखील हे घड्याळ सांगू शकणार आहे. तर दुसरीकडे अ‍ॅपल वॉचचं डिझाइन थोडंफार पूर्वीप्रमाणेच दिसणार असून त्यात फारसे बदल दिसणार नाहीत. अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये यावेळी स्टॅपचं डिझाईन बदलण्यात आलं आहे. तर फिटनेससाठीही यात अनेक फीचर्स देण्यात आले असून स्लीप ट्रॅकिंगही यापैकी एक आहे.


अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये नवे वॉच फेस देण्यात आले आहेत. निरनिराळ्या वेळी आपल्या गरजेप्रमाणे त्यांना कस्टमाईझ करण्याची सुविधाही त्यात देण्यात आली आहे. अ‍ॅपल वॉच सीरिजची भारतातील सुरूवातीची किंमत ही ४० हजार ९०० रुपये इतकी असेल. तर त्याच्या GPS+Cellular व्हर्जनची किंमत ४९ हजार ९०० रूपये इतकी असेल. अ‍ॅपल वॉच जीपीएस मॉडेलची किंमत २९ हजार ९९९ रूपये तर GPS+Cellular व्हर्जनची किंमत ३३ हजार ९०० रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.


अ‍ॅपल वॉच एसई दिसण्यात अ‍ॅपल वॉच सीरिज ३ प्रमाणे आहे. यामध्ये फॉल डिटेक्शन फीचरही देण्यात आलं आहे. तसंच ते स्वीम प्रूफही आहे. त्यात फॅमिली सेटअप, फेस शेअरिंग, स्लीप ट्रॅकिंगसारखे फिचर देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये एस ६ हा प्रोसेसर देण्यात आला असून पूर्वीच्या प्रोसेसरच्या तुलनेत तो २० टक्के अधिक फास्ट असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त हे वॉच १५ सेकंदात ब्लड ऑक्सिजन लेव्हलदेखील मॉनिटर करतं. तर याचा ऑलवेज ऑन डिस्प्ले गेल्या व्हर्जनच्या तुलनेत अधिक ब्राईट असल्याचंही सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 7:40 am

Web Title: apple watch series 6 launched tracks blood oxygen levels in covid 19 times new virtual event jud 87
Next Stories
1 KBC मध्ये ५ कोटींचं बक्षीस जिंकणारा सुशील म्हणतो, त्यानंतर सगळंच बिघडत गेलं !
2 सशालाही लाजवेल असा कासवाचा वेग, एकाच फटक्यात कबुतराची शिकार; व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
3 व्यंकय्या नायडूंनी मनोज झा यांची फिरकी घेताच राज्यसभेत पिकला हशा
Just Now!
X