News Flash

अॅपल लॉन्च करणार ‘ड्युएल सिम’ आयफोन

पुढच्या वर्षी तीन मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता

आयफोन

आयफोन हा स्मार्टफोनच्या जगतामधील सर्वोत्तम फोनपैकी एक असला तरी अनेक भारतीय केवळ ड्युएल सिम नसल्याने हा फोन घेणे टाळतात. मात्र पुढील वर्षी येणारा नवीन आयफोन ड्युएल सिम फोन असल्याची बातमी आहे. अॅपल पुढच्या वर्षी तीन मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे.

‘केजीआय सिक्युरीटीज’ या तैवानमधील अग्रगण्य कंपनीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध तज्ञ मिंग-ची कुओ यांनी लिहीलेल्या एक नोटमध्ये २०१८पासून येणाऱ्या सर्व आयफोनच्या मॉडेलमध्ये ड्युएल सिम सपोर्ट असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या आयफोनमधील देन्ही सिम स्लॉट हे ‘एलटीई’ प्रकारातील असतील. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व ड्युएल सिम फोन हे ‘एलटीई’ आणि ‘थ्री जी’ प्रकारातले आहेत. ‘एलटीई’ म्हणजे फोरजी आणि त्यावरील तंत्रज्ञान असणाऱ्या सीम कार्डवर चालणारे फोन. ‘२०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये ‘एलटीई’ ट्रान्समिशन स्पीडबरोबरच ड्युएल स्टॅण्डबाय फिचरही उपलब्ध होईल. ‘एलटीई-थ्री जी’ऐवजी या फोनमध्ये ‘एलटीई-एलटीई’ तंत्रज्ञान असेल, असा उल्लेख कुवोंनी त्यांच्या लेखात केला आहे.

‘एलटीई’ तंत्रज्ञानाच्या मदतीने अॅपलचे कनेक्टीव्हीटी फिचर्स आणखीनच मजबूत होतील. २०१८मध्ये आयफोन ‘बेसब्रॅण्ड’ म्हणजे साध्याप्रकाराच्या चीपचा उपयोग करण्याऐवजी ‘इंटेल एसएमएम ७५६०’ आणि ‘क्वॉलकॉम एसडीएक्स २०’चा वापर करेल. कारण ‘इंटेल एसएमएम ७५६०’ आणि ‘क्वॉलकॉम एसडीएक्स २०’ ह्या दोन्ही चीप ‘फोर इन टू फोर एमआयएमओ’ तंत्रज्ञानावर काम करतात, यामुळे फोनचा वेग वाढणार असल्याचे कुओंनी म्हणटलं आहे.

अॅपल कंपनी साधारण सीम आणि ईसीम सपोर्ट करणारा ‘ड्युएल सिम’ आयफोन बाजारात आणू शकते, अशी शक्यता इंडिया टुडेच्या वृत्तामध्ये वर्तवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी लॉन्च केलेल्या ‘अॅपल वॉच सिरीज ३’ मध्ये पहिल्यांदाच ‘ईसीम’चा पर्याय देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:09 pm

Web Title: apples 2018 iphones may finally support dual sim cards says reports
Next Stories
1 तुमच्याकडे शिओमीचा फोन आहे ? एक्सचेंजमध्ये मिळू शकेल नवीन मॉडेल
2 व्होडाफोनचा ३४९ चा प्लॅन तुम्हाला माहितीये?
3 ‘हे’ आहेत ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय
Just Now!
X