अनेक वेळा भाजीमंडईत गेल्यावर भाज्यांसोबतच काही फळांचीदेखील रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे आंबा, फणस, पेरु, चिकू ही फळे साऱ्यांनाच ठाऊक आहेत आणि ती अनेक वेळा घराघरात पाहिलीदेखील जातात. मात्र काही फळे अशी असतात ज्यांच्याविषयी सामान्यपणे फारशी माहिती नसते. परंतु, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. यातच उदाहरण घ्यायचं झालं तर अ‍ॅप्रिकोट या फळाविषयी जाणून घेऊ. फारसं परिचयाचं नसलेल्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिअम,आर्यन, कॉपर,पोटॅशिअम,फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असतं.

अ‍ॅप्रिकोट खाण्याचे फायदे –

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

२. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अ‍ॅप्रिकोटच्या रसाचं सेवन करावं

३. अ‍ॅप्रिकोटमध्ये व्हिटॅमिन सी’चे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला तजेला मिळतो.

४.अ‍ॅप्रिकोट खाल्ल्यामुळे केसगळती काही काळात कमी होते.

५.रक्ताची कमतरता भरुन निघते

वाचा : आम्लपित्ताच्या विकारावर गुणकारी असणाऱ्या खरबूजाचे ८ फायदे

६. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते.

७.हाडे बळकट होतात.

८. पचनसंस्था सुधारते.