002(छाया सौजन्य – रेन सिस्सेल टंब्लर)

सुंदर अथवा फॅशनेबल दिसाणे अनेकांना आवडते. त्यासाठी त्यांच्याकडून नानावीध गोष्टींचा अवलंब केला जातो. मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, वेगळ्या धाटणीची केशरचना ठेवणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक फॅशनेबल गोष्टींचा वापर करून, इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी प्रयत्न केला जातो. शरीरभर गोंदवून घेणे किंवा जिभेत, ओठात अथवा नाभीत रिंग अडकविण्यासारख्या धाडसी फॅशनचा अवलंबदेखील काहीजण करतात. फॅशनचे ट्रेण्डस् सतत बदलत असतात. क्वचित प्रसंगी त्यात नाविन्यपूर्ण फॅशनची भरदेखील पडते. पुढे अनेकजण त्याचा स्विकार करतात दिसतात. बगलेतील केस रंगविण्याची एक अनोखी फॅशन हल्ली पाहायला मिळत आहे. खासकरून स्लिव्हलेस कपडे घालण्यासाठी स्त्रिया बगलेतील केस काढतात. परंतु, काही धाडसी स्त्रियांनी बगलेतील केस वाढवून त्यांना गुलाबी, हिरव्या निळ्या आणि लाल रंगासारख्या गडद रंगांनी रंगविण्याचा मार्ग स्विकारला आहे. या धाडसी महिला रंगीत केस असलेल्या आपल्या बगलेची छायाचित्रे सेल्फीद्वारे सोशल मिडीयावर पोस्ट करत असून, ही छायाचित्रे नेटकरांचे लक्ष वेधून घेत आहे. तुम्हाला सुध्दा या फॅशनचे अनुकरण करायला आवडेल का?

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

001(छाया सौजन्य – डेस्टिनी एम, युट्यूब)

003(छाया सौजन्य – आर्मपीट हेअर डोन्ट केअर, टंब्लर)

005(छाया सौजन्य – ब्युटी हेवन डॉट कॉम डॉट एयु)