डॉ.अमोल देशमुख

व्यसन ही एक मेंदूशी निगडित गुंतागुंतीची अवस्था आहे, ज्यात व्यक्ती एखाद्या व्यसनाच्या पदार्थाचे सेवन, त्याच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही करत राहतो.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दारूच्या अतिसेवनाने दरवर्षी जगात ३.५ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. संपूर्ण जनतेच्या जवळपास ३८.५ टक्के लोक मद्यसेवन करतात, ज्यापैकी प्रत्येक व्यक्ती जवळपास १७ लिटर दारू दरवर्षी घेतो. सद्य परिस्थितीत ३१ दशलक्ष लोकांना मादक पदार्थाच्या सेवनामुळे विविध आजार झाले आहेत. मादक पदार्थाच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये बदल होतात. बरेच लोक स्वत:ला उत्साही वाटावे, काही लोक तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा स्वत:ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या दबावाखाली येऊन किंवा व्यवसायाची गरज म्हणून किंवा कधी आनंद साजरा करण्यासाठी व्यसनाची सुरुवात करतात.  या पदार्थामध्ये मुख्यत: तंबाखू, दारू, चरस, गांजा, कोकेन, व्हाइटनर इत्यादी असू शकते. फोन किंवा इंटरनेटचा अतिवापरसुद्धा या प्रकारात मोडला जाऊ शकतो. हे पदार्थ घेतल्यानंतर मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायनांचा स्राव वाढतो, ज्यामुळे मनाला छान वाटते आणि मेंदूमधील रिवार्ड सिस्टीम परत परत करण्याची सवय लावते. व्यसने तुम्हाला त्याचा गुलाम बनवितात.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

व्यसनाधीनतेच्या जैविक कारणामध्ये आनुवांशिकता, मानसिक कारणांमध्ये मानसिक आजार, स्वभावातील दोष, तणाव, अतिधाडसीपणा, न्यूनगंड व्यसन जडण्यामागे कारणीभूत ठरते. सामाजिक कारणांमध्ये पदार्थाची सहज उपलब्धता, सहकार्याचा दबाव या प्रकारची कारणे आहेत.  व्यसनाचा पदार्थ सतत घेण्याची तीव्र इच्छा होणे, नेहमीसारखीच नशा चढण्यासाठी जास्त प्रमाणात व्यसनाचा पदार्थ घेणे, नशा बंद केल्यास शारीरिक, मानसिक त्रास होणे, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व आर्थिक समस्यांना सामोरे जात असतानाही व्यसन सोडता न येणे, जास्त वेळ व्यसन किंवा त्या निगडित बाबीमध्ये घालवणे ही लक्षणे असल्यास व्यक्तीस व्यसनाचा आजार झालाय असे म्हणता येईल.

व्यसन व्यक्तीच्या जीवनावर सर्वागीणदृष्टय़ा परिणाम करते. व्यसन जगण्यातला  रस, स्वाद आणि जीवनाचा दर्जा कमी करते, मानसिक आजार होण्याचा धोका वाढवतो, नशेमध्ये अपघात होतात, कार्यक्षमतेचा ऱ्हास होतो, व्यक्तीची प्रेरणा नष्ट करतो, अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण देते, नपुंसकत्व, आर्थिक संकट, कार्यक्षेत्रातील प्रॉब्लेम, सततची गैरहजेरी, कोर्टकायदा याच्या समस्या वाढू लागतात, समाजातील आदर  कमी होतो,  घरातील शांतता भंग होते, मुलांमध्ये ताणतणाव वाढवते,  मुले तुम्हाला पाहून व्यसनांकडे सहज आकर्षित होतात.

व्यसनाचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडणे शक्य आहे. मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसतज्ज्ञ यांच्या मदतीने हे शक्य आहे. औषधोपचार, समुपदेशन यांसाठी महत्त्वाचे असते. वैचारिक आणि व्यक्तिमत्त्वातील बदल, वैयक्तिक आणि समूह समुपदेशन व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असते. घरातील वातावरण निरोगी ठेवणे, नातेसंबंध दृढ करणे, छंद, खेळ, व्यायाम हे व्यसनापासून दूर जाण्यासाठी मदत करतात. अल्कोहोलिक अनोनिमससारखे (प्रभावी समूह मदतगट व्यसनापासून दूर राहण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.