डॉ. पी. सुरेश, नेत्रतज्ज्ञ ’ प्रेसब्योपिया

मानवाला नैसर्गिकरीत्या वृद्धापकाळाचा सामना करावाच लागतो आणि डोळा हा अवयव याबाबतीत अपवाद नाही. डोळा कॅमेऱ्यासारखा आहे, ज्यामध्ये दोन लेन्स सिस्टीमसह (कॉर्निया व नैसर्गिक लेन्स) एक स्क्रिन (रेटिना) व एक केबल (ऑप्टिक नव्‍‌र्ह) आहे, जे डोळ्यांना मेंदूशी जोडतात. डोळ्यांमध्ये येणारे विविध वृद्धत्व बदल मूलभूतरीत्या नैसर्गिक असून त्याचे कोणतेच गंभीर परिणाम नाहीत. पण क्वचितच त्याचा डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्यासोबत गंभीर परिणाम होऊ  शकतात. आपण वृद्ध होत असताना अनुभवल्या जाणाऱ्या काही समस्यांबाबत माहिती करून घेऊ या.

हा आजार सामान्यत: वयाच्या ४०व्या वर्षी होतो. या आजारामध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसणे अवघड होऊन जाते आणि हा आजार जवळपास जागतिक स्तरावर आहे. या आजारामध्ये जवळच्या वस्तू पाहण्यासाठी लेन्सला मदत करणाऱ्या सूक्ष्म रचना व स्नायू कडक होतात. यामुळे नैसर्गिक लेन्स जवळच्या वस्तू पाहताना तिचा आकार बदलू शकत नाही. सामान्यत: ४० वर्षांवरील व्यक्ती बारीक अक्षरे वाचण्यामध्ये अवघड होत असल्याची तक्रार करू लागतात किंवा अक्षरे समजण्यासाठी वाचन करावयाचा पेपर डोळ्यांपासून काही विशिष्ट अंतरावर धरावा लागतो.

उपाय : सामान्यत: मोनोफोकल, बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह लेन्सेसच्या रूपात वाचनासाठी वापरला जाणाऱ्या चष्म्यांचा वापर करण्यास सांगितले जाते. वयाच्या ४० वर्षे ते ५५ वर्षांपर्यंत प्रेसबायोपिया अधिक खालावत जात असल्यामुळे वाचनासाठी वापरल्या जाणाऱ्या चष्म्यांचा नंबर हळूहळू वाढत जातो.

’ मोतीबिंदू

डोळ्यांमधील आणखी एक वृद्धत्व बदल म्हणजे मोतीबिंदू होणे. या आजारामध्ये लेन्सची सामान्य पारदर्शकता कमी होते आणि अपारदर्शक व पुसट बनते. मोतीबिंदूच्या प्रमाणानुसार दृष्टी अधू होण्याचे प्रमाण विभिन्न असू शकते.

’ उपाय : आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये चष्मा बदलणे पुरेसे ठरू शकते, पण प्रगत टप्प्यावर असल्यास शस्त्रक्रिया आवश्यक आहे. यामुळे डोळे कोरडे होणे, मोठे दिसणे, लाल होणे आणि डोळे थकल्यासारखे वाटणे अशा समस्या होऊ  शकतात.

’ डोळे कोरडे होणे

कोरडे डोळे सामान्यत: वाढत्या वयासह आढळून येतात. डोळ्यांमध्ये अश्रूचे पाणी तयार होणे कमी होत जाते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आढळून येते.

उपाय : बहुतांश व्यक्तींमध्ये पूरक टीअर ड्रॉप्स/ आय ल्युब्रिकण्ट्ससह या आजाराचा सुलभपणे उपचार करता येतो.

’ एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरशेन (रेटिना)

डोळ्याचा आणखी एक भाग ज्यावर परिणाम होऊ  शकतो (सामान्यत: वयाच्या ६५ वर्षांनंतर) तो भाग आहे रेटिना. या आजाराला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) म्हणतात, ज्यामध्ये रेटिनाचा मध्यभाग कमकुवत व बारीक बनतो. ज्यामुळे काही अंशी वाचन करताना दृष्टीवर परिणाम होतो. क्वचितच एएमडीच्या मध्यभागी असलेल्या रेटिनामधील फ्लूइड व रक्त संचयनावर परिणाम होऊन दृष्टीवर गंभीररीत्या परिणाम होऊ  शकतो.

उपाय : सध्या, नवीन इंजेक्शन थेरपीज अनेक रुग्णांना आशेचा किरण देत आहेत.

’ काचबिंदू

वृद्धत्वाशी संबंधित आणखी एक आजार म्हणजे काचबिंदू. डोळ्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थाचे सामान्यत: सततपणे अभिसरण होत असते. वाढत्या वयासह बाहेरील मार्ग कडक होऊन जातो आणि परिणामत: फ्लूइड ड्रेनेजच्या स्थितीमध्ये अवघडपणा येतो. त्याचा डोळ्यांवर मोठा परिणाम होऊन काचबिंदू होतो. या आजाराचा योग्य वेळी उपचार केला नाही तर डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ  शकतो.

उपाय : बहुतांश रुग्णांवर आय ड्रॉप्ससह उपचार करण्यात येतो, ज्यामधून समाधानकारक परिणाम मिळतात. काही रुग्णांसंदर्भात डोळ्यावरील ताण नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

वृद्धत्वासह डोळ्यांच्या दृष्टीमध्ये सामान्य बदल होण्याव्यतिरिक्त सूर्यप्रकाशामुळे वयाशी संबंधित बदलांमध्ये जलदपणे भर पडते. बेरी, सोयाबीन, कंदमुळे, शिमला मिरची इत्यादीसारखे अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्सनी युक्त पदार्थाचे सेवन केल्याने रेटिनाची वृद्धत्व प्रक्रिया कमी होते आणि वयाशी संबंधित सामान्य नुकसानापासून संरक्षण होते. संपूर्ण आयुष्यभर बाहेर जाताना अल्ट्राव्हायोलेट फिल्टर सनग्लासेसचा वापर केल्याने निश्चितच रेटिनावर प्रकाशामुळे होणारे परिणाम कमी होतात. वयाच्या ४० वर्षांनंतर नियमितपणे डोळ्यांची तपासणी आणि मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण ठेवल्याने दीर्घकाळापर्यंत डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये मदत होईल. शेवटचे म्हणजे डोळ्यांमध्ये जळजळणे, पुसट दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे किंवा इतर असामान्य लक्षणं दिसून येत असतील तर विलंब न करता नेत्रतज्ज्ञ (ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट) किंवा स्थानिक डॉक्टरांशी सल्लामसलत करा.