21 September 2020

News Flash

पाठदुखीने त्रस्त आहात का? हे वाचा

डॉक्टरांकडे किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला भेट देण्याचे पाठ दुखी हे एक सर्वसामान्य कारण आहे

-डॉ. जशन विश्वनाथ

डॉक्टरांकडे किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला भेट देण्याचे पाठ दुखी हे एक सर्वसामान्य कारण आहे. कामावर अनुपस्थितीत राहण्याच्या मुख्य कारणांपैकी हे एक आहे. लोकांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टक्के वयाचा एक भाग तरी पाठदुखीच्या त्रासाने ग्रस्त असल्याचे दिसून येते. पाठदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते आणि त्यासाठी काही प्रमाणात वयाप्रमाणे वेगवेगळे कारण हि असू शकतात. पाठ दुखी होण्याचे सामान्य कारणे म्हणजे दुखापत, मुरगळणे, जड वस्तू उचलताना लचकणे किंवा जास्त शारीरिक कार्य केल्याने होते.

दुखापतीची पार्श्वभूमी नसताना कामाच्या वेळी खराब झालेले बायोमेकॅनिक्स हे एक मुख्य कारण असू शकते.

पाठदुखी एक किंवा दोन अवयव निकामी करू शकते, विशेषतः एखादी जड वस्तू उचलल्यानंतर डिस्क पेन किंवा सायटॅटिका निकामी होऊ शकते. कधीकधी शिंकणे आणि सुका खोकला या प्रकारच्या वेदना बॅक पेनला कारणीभूत असू शकतात.

तरुण रुग्णांना, ज्यांना गंभीर वेदना होत असतील त्या काही तासांपर्यंत टिकतात, विशेषतः पुरुषांमध्ये  किंवा संधिवात असलेल्याना एंकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस च्या समस्याग्रस्तांना याचा त्रास अधिक होऊ शकतो.

वेदना, ताप आणि वजन कमी होणे असे एकत्रित लक्षणे असल्यास रक्ताच्या क्षयरोगाचे लक्षण असू शकते.

पोटऱ्यांच्या वेदनांसह चालल्यानंतर पाठीत वेदना जास्त होतात, तेंव्हा स्पाइनल कॅनल स्टेनोसिसचा त्रास होऊ शकतो.

ओस्टियोपोरोटिक कंप्रेशन फ्रॅक्चरमुळे वयोवृद्ध व्यक्तीच्या किरकोळ पाठीमध्ये वेदना होऊ शकते.

इतर सामान्य कारणे; असामान्य रीढ़ विवर्ण, वृद्धत्व, स्पॉन्डीलायसिस, संसर्ग, ट्यूमर आणि मेटास्टॅसिसमुळे गाठ तयार होणे.

वेदना तीव्र किंवा जुनाट असू शकतात. तीव्र वेदना अचानक येतात आणि जुनाट वेदना ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात असलेल्या जागी येतात.

पाठीच्या खालच्या भागातील दुखणे (लोअर बॅक पेन) अधिक गंभीर असून आपले अवयव कमजोर करतात, ज्यामुळे एक किंवा दोन्ही अंग निकामी होऊ शकतात. पाठीच्या भागातील एक किंवा अधिक हालचाली प्रतिबंधित होऊ शकतात. कधीकधी पाठीतील वेदना सांधे किंवा शरीरातील इतर भागांशी संबंधित असू शकतात. जर पाठदुखी कोणत्याही अशक्तपणाशी संबंधित असेल किंवा मूत्राशय / आंत्रांशी संबंधित असेल तर त्याने रुग्णालयात किंवा ऑर्थोपेडिक सर्जनशी त्वरित संपर्क साधने गरजेचे आहे

पाठीच्या वेदनेमध्ये पुनरावृत्ती होऊ शकते किंवा काही आठवडे वेदना विरहित हि असू शकते.

निदान पुष्टी करण्यासाठी, ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्यावा. पाठीच्या वेदनांचे कारण ओळखून तो चांगल्या प्रकारे परीक्षण करेल. क्ष-किरण, एमआरआय, सीटी स्कॅन, इलेक्ट्रोडिग्नोस्टिक चाचणी आणि रक्त तपासणी निदान करण्यासाठी आवश्यक असू शकते.

बहुतेक पाठदुखीची औषधे, फिजियोथेरपी, जीवनशैलीतील काही बदल करून वैद्यकिय पद्धतीने उपचार केले जातात. योग्य स्थितीत ठेवून पाठीचे स्नायू मजबूत करणे, जड वस्तू चांगल्या प्रकारे उचलणे, तणाव कमी करणे आणि धूम्रपान टाळण्याद्वारे बॅक पेनला कमी करता येते. पोहण्याचा व्यायाम पाठीच्या दुखण्यासाठी चांगला असू शकतो.

फार कमी रुग्ण, ज्यांच्यात इंट्रास्पिनल पॅथॉलॉजीचा कोणताही पुरावा नाही, अशावेळी पाठदुखीचे निदान करताना कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद देत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये मनोवैज्ञानिक समस्या असू शकते. या रुग्णांना मनोचिकित्साची आवश्यकता भासू शकते आणि कार्यक्षम पुनर्वसन कार्यक्रमातून त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
( लेखक ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असून जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 5:40 pm

Web Title: article on back pain
Next Stories
1 Vivo V15 च्या किंमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत
2 फीचर फोनच्या मार्केटमध्ये Jio अव्वल, सॅमसंग दुसऱ्या स्थानी
3 Xiaomi ने लाँच केला LED स्मार्ट बल्ब, 11 वर्ष खराब न होण्याचा दावा
Just Now!
X