तेसंबंध जोडणे माणसाला आवडते. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी हे जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा आपल्या जवळच्या माणसासारखीच त्यांची काळजी घेणे भाग पडते. आज व्यक्ती कोणत्याही कारणाने प्राण्यांचे पालन करीत असला तरी पाळीव प्राणी आणि मनुष्य या परस्परांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते निर्माण होते. अशाच वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांची ओळख, त्यांचे खाद्यपदार्थ, या प्राण्यांच्या सवयी, त्यांना होणारे आजार, त्यासाठी घ्यावयाची काळजी या सर्व बाबींबद्दल माहिती देणारे पाळीव प्राण्यांचे हे नवे सदर..

प्राचीन काळापासून माणूस आणि प्राणी दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले आहे. निसर्ग नियमानुसार माणूस आणि प्राणी यांची शरीरयष्टी वेगळी असली तरी सजीव ही संकल्पना दोघांच्याही बाबतीत खरी ठरते. आजच्या काळात माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेवर अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी प्राचीन काळात मनुष्य संपूर्णत: प्राण्यांवर अवलंबून होता. प्राण्यांची शिकार करून मनुष्य आपला उदरनिर्वाह करत होता. कालांतराने मनुष्याने शिकाऱ्याची भूमिका बदलून अर्थार्जन करण्यासाठी प्राण्यांचे पालन करण्यास सुरुवात केली. इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिकवलेला मनुष्य आणि प्राणी यांच्या परस्परसंबंधाचा हा अभ्यास आजही प्रत्येकाच्या तोंडपाठ असेल. मात्र काळ बदलतो तशाच जगण्याच्या आणि गरजेच्या व्याख्याही बदलतात. अलीकडच्या काळात पाळीव प्राणी पाळण्याची संख्या वाढलेली दिसून येते. प्राण्यांची आवड, छंद, किंवा अभ्यास या उद्देशाने अनेकजण आपल्या घरी प्राणी पाळतात. या पाळीव प्राण्यांमध्ये (पेट) कुत्रा आणि मांजर हेच प्राणी घरात जास्तीत जास्त पाळले जात होते. मात्र अलीकडे पाहिले तर अनेक घरांत आवड म्हणून ससा, मासे, काही पक्षी पाळलेले दिसतात. या प्रत्येक प्राण्यांची त्यांची स्वतंत्र वैशिष्टय़े असतात. कुत्रा पाळतानासुद्धा हल्ली परदेशी ब्रीड्ससाठी लोकांची जास्त पसंती आहे. डॉबरमॅन, लॅब्रेडोर, कॉकर स्पॅनिअल, जर्मन शेफर्ड यांसारख्या अनेक कुत्र्यांचे प्रकार घरोघरी पाहायला मिळतात. कुत्र्यांच्या प्रत्येक प्रकाराचे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे. उदाहरणार्थ कॉकर स्पॅनिअल ही कुत्र्यांची जात संरक्षणासाठी नसते तर ती केवळ एक छंद, मौज म्हणून उपयोगी पडते. याउलट डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड हे कुत्र्यांचे प्रकार संरक्षण किंवा गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाहायला मिळतात. प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते असे म्हणतात. याचाच अर्थ प्राण्यांनासुद्धा त्यांचा स्वभाव असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ही मनुष्याच्या बाबतीतील म्हण प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच खरी ठरते. आपली व्यक्ती कोण आणि परकी व्यक्ती कोण यातला फरक त्यांना कळतो. काही कुत्रे शांत तर काही अतिशय रागीट, काहींचा उपयोग केवळ घरापुरताच तर काहींचा उपयोग गुन्हेगार शोधण्यासाठी होतो. त्यानुसार या विशिष्ट कुत्र्यांची निवड केली जाते. मात्र या सर्व गोष्टी प्राण्यांनी आत्मसात करण्यासाठी त्या संदर्भातील शिकवण आपण त्यांना देणे गरजेचे असते.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

मुक्या प्राण्यांवर दया करावी असे म्हणतात मात्र ही भूतदया आपल्या सोईनुसार नसावी. शास्त्रीयदृष्टय़ा त्यांच्या सर्व गरजा समजून घेऊन त्याची पूर्तता व्हायला हवी. यासाठीच या सर्व मुद्दय़ांवर तज्ज्ञ वैद्यांशी चर्चा करून पाळीव प्राण्यांच्या विशिष्ट प्राणी जातीसंदर्भात माहिती या सदराच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

सोशल नेटवर्किंगचा फायदा

आहार पुरेसा असला तरी त्यानुसार योग्य व्यायाम त्यांच्याकडून व्हावा लागतो. आपण घरात पाळणाऱ्या कोणत्याही प्राण्याविषयी ही माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. यासाठी कोणताही प्राणी पाळण्यासाठी विकत घेताना त्या संबंधित प्राण्याच्या सवयींविषयी, त्याच्या क्षमतेविषयी इत्थंभूत माहिती घेणे हे मालक म्हणून आपले कर्तव्य आहे.

यासाठी प्राण्यांविषयी प्रेम असणाऱ्या विविध लोकांचे समूह सोशल नेटवर्किंग साइटवर पाहायला मिळतात.

पाळीव प्राण्यांचा आहार

मासे : माशांसाठी खास खाद्यपदार्थ फिश सेंटरमध्ये मिळतात. त्यामध्ये मायक्रोन्युट्रेशन, व्हिटॅमिन पावडर यांचा समावेश असतो.

कोणत्या प्रजातीचे मासे आहे, हे ठरवूनच आहार द्यावा.

पक्षी : पक्ष्यांसाठीचे अन्नपदार्थही बाजारात मिळतात. त्यामध्ये बहुधा बियांचा समावेश असतो, पण सर्वच पक्षी बिया सेवन करत नाहीत. काही पक्षी मांसाहारीही असतात.

मांजर : मांजर दूध पिते. मात्र त्याशिवाय मांजरासाठीचे सप्लिमेंट, व्हिटॅमिन, मिनरल बाजरात मिळते. कुत्रे : पाळीव कुत्रा मिश्रहारी की मांसाहारी याची माहिती घ्या.

मांसाहारी कुत्र्यांसाठी दररोज चिकन, मटन उपलब्ध केले पाहिजे.

‘पेट’ निवडताना

’एखादा प्राणी पाळताना त्यांची प्रजाती कोणती? त्याचे महत्त्व काय? या प्रजातीच्या सवयी, खाद्यपदार्थ, स्वच्छता आदींची माहिती करून घ्या.

’पाळीव प्राणी मिश्रहारी आहे की मांसाहारी आदींची माहिती करून घ्या. काही कुत्रे केवळ मांसाहारी असतात. त्यामुळे त्यांच्या खाद्यपदार्थाची माहिती करूनच त्यांना आहार द्या.

’आपण शिकवलेल्या सवयी हे प्राणी शिकतात आणि त्यानुसार वर्तन करतात. काही प्राण्यांचे मालक आपल्या प्राण्याचे अतिशय लाड करतात तर प्राण्याला एकदा भरपूर खायला दिले की नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या दोन्ही परिस्थितीमध्ये प्राण्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे असते.

’प्राण्यांची स्वच्छता हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांना आंघोळ कशी घालतात? किंवा त्यांच्या स्वच्छतेविषयी माहिती करून घ्या.

’पाळीव प्राणी केवळ घरातच ठेवणे अयोग्य आहे. त्याला वेळोवेळी बाहेर फिरवून आणणे गरजेचे आहे.

’संपूर्ण कुटुंब बाहेर जाणार असेल, तर पाळीव प्राण्याला सर्व सुविधा मिळतील, अशी सोय करून जावे.

’प्राण्याच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. वेळोवेळी पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
-’किन्नरी जाधव, ’संदीप नलावडे