संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंड विकसित केले असून ते स्वयंचलित पद्धतीने इन्सुलिन पुरवण्याचे काम करते. त्यामुळे मुलांच्या रक्तामधील साखरेची पातळी प्रभावी आणि सुरक्षितपणे नियंत्रणात राहत असून, यामुळे टाइप १ चा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

कृत्रिमरीत्या तयार केलेल्या स्वादुपिंडाचे काम स्ययंचलित पद्धतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासह त्याचे नियमन करणे आहे. यामुळे टाइप १ चा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची सातत्याने इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज कमी होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी हे कृत्रिम स्वादुपिंड तयार केले आहे. स्मार्टफोनवर आधारित वायरलेस असणाऱ्या या स्वादुपिंडामुळे रक्तातील साखरेची पातळी ओळखली जाते. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास इन्सुलिन पुरवण्यात येते.

या कृत्रिम स्वादुपिंडामुळे स्वयंचलित पद्धतीने टाइप १ मधुमेहासाठी आवश्यक त्या प्रमाणात इन्सुलिन पुरवण्यात येते. हे अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असून, ५ ते ८ वर्षांच्या मुलांना होणाऱ्या मधुमेहावर प्रभावी असल्याचे विद्यापीठाच्या मार्क डीबोईर यांनी म्हटले आहे.

या अभ्यासासाठी पाच ते आठ वर्षे वयाच्या १२ मुलांचा समावेश करण्यात आला होता. या मुलांना टाइप १ चा मधुमेह होता. त्यांना इन्सुलिनचा पंप देऊन त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी तपासण्यात आली. कृत्रिम स्वादुपिंडाच्या वापराला ही मुले सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे आणि त्याचा योग्य तो परिणाम होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.