घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत. कुठल्याही पदार्थामध्ये हिंग टाकल्याने त्या पदार्थाचा खमंगपणा वाढून सुंदर सुवास सर्वत्र पसरतो. हिंगामध्ये स्वादासह औषधी गुणधर्म असतात. आपल्या आहारात हिंगाचा समावेश असेल, तर आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. जाणून घेऊयात हिंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

स्वयंपाकाकरिता आवश्यक असणारा हिंग बाजारात कमी-अधिक तिखटपणा, वासाचा मिळतो. व्यापारी आपापल्या फॉम्र्युलाप्रमाणे मूळ हिराहिंगात भेसळ करून विकतात. मूळ हिराहिंग खूपच कडू असतो. तो नेहमीच्या स्वयंपाकात वापरताच येणार नाही. मात्र पोटदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी याकरिता हिराहिंग किंवा नेहमीच्या हिंगाचा गरम गरम दाट लेप उत्तम काम करतो. चांगल्या दर्जाचा हिंग हा उत्तम वातनाशक आहे. हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला की कसलेही अजीर्ण दूर होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

हिंग वातानुलोमक आहे. आमाशयात वा पक्काशयात वायू अडला असो, हिंग लगेच वायू मोकळा करतो. हिंग भाजून त्याची कढी किंवा ताक हे सर्वानाच माहीत असलेले औषध आहे. हर्निया, पोटदुखी, पोटफुगी, आमांश, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घ्यावे. सर्दी, पडसे, अर्धशिशी या विकारांत हिंगाचे पाणी तारतम्याने नाकात टाकावे. वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो. प्रसिद्ध हिंगाष्टक चूर्णातील प्रमुख घटकद्रव्य हिंग आहे.

पुरुषांच्या हर्निया/ अंडवृद्धी या विकारांत हिंग-लसुणादी तेल मोठेच योगदान देते. एक भाग हिंग, तीन भाग सैंधव, नऊ भाग एरंडेल तेल व सत्तावीस भाग लसणीचा रस असे एकत्र मिश्रणाचे आटवून सिद्ध केलेले तेल हर्नियाकरिता एकदम अफलातून औषध आहे.