News Flash

Mobile Review : झेनफोन थ्री एस मॅक्स

जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाइल हाच खरा आपला मित्र. म्हणजे अगदी सकाळी उठायला मदत करतो, आपल्या लोकांशी संपर्क करवून देतो, आवडीचे क्षण संग्रहित करतो, करमणूक करतो, महत्त्वाचे काम करवून देतो किंवा करायला मदत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगाशी आपल्याला जोडून ठेवतो. असा हा आपला मित्र मात्र बॅटरी कमी असेल तर आपल्यासोबत असून नसल्यासारखा होतो. ही सगळी कामं करताना आपल्याला त्याची इतकी सवय झालेली असते की त्याच्याशिवाय सगळंच अवघड होऊन बसतं! म्हणून असूस या कंपनीने त्यांच्या आगामी मोबाइल फोनमध्ये जास्तीत जास्त बॅटरी देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाइलचा अधिक आणि विनाअडथळा उपयोग करता येईल. असूस झेनफोन थ्री एस मॅक्स या मोबाइलमध्ये पाच हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. एवढी मोठी बॅटरी असल्यामुळे तुम्ही या मोबाइलचा जास्त वेळ उपयोग करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर तुम्ही दोन ते तीन दिवस मोबाइलचा उपयोग करू शकता. कमी बॅटरी उपलब्ध असताना मोबाइलचा वापर अधिक करता यावा यासाठी मोबाइलमध्ये सुपर सेव्हिंग मोड देण्यात आले आहे. जेव्हा मोबाइलची बॅटरी कमी शिल्लक असेल, अशा वेळी तुम्ही या मोडचा उपयोग करून बॅटरी अधिक काळ टिकवू शकता. हा मोबाइल जलद चार्जिग करत नाही.

या ‘झेनफोन थ्री एस मॅक्स’मध्ये ५.२ इंचांचा एचडी आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि २.५ डी ग्लास लावण्यात आली आहे, ज्यामुळे मोबाइल अधिक आकर्षक झाला आहे. मोबाइलच्या पुढील बाजूस सुरक्षेच्या विचार करून फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, ज्याचा उपयोग मोबाइल अनलॉक करण्यासाठी तुम्ही करू शकता. यात तुम्ही पाच वेगवेगळे फिंगरप्रिंट ठेवू शकता आणि हा मोबाइल तुमचे िफगरप्रिंट्स ३६० अंशातून ओळखू शकतो. त्यामुळे तुम्ही मोबाइल सरळ किंवा उलटा पकडूनसुद्धा अनलॉक करू शकता. मोबाइलच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि दोन फ्लॅश देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुमचे फोटो अधिक चांगल्या प्रकारे येतील. तर पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा उपयोग सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी करू शकता. या कॅमेऱ्याचे वैशिष्टय़ म्हणजे यात झिरो शटर (फोटो काढल्यावर लगेच तो टिपला जातो), एचडीआर (चांगल्या दर्जाचे फोटो) आणि कमी प्रकाशातसुद्धा चांगले फोटो येतील. झेनफोन थ्री एस मॅक्समध्ये मीडिआटेकचा एमटी ६७५० हा ऑक्टा कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड सेव्हन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या मोबाइलमध्ये फाइव्ह मॅग्नेट स्पीकर हे एक वैशिष्टय़ वापरण्यात आले आहे, ज्यामुळे मोबाइलमधून चांगल्या प्रकारचा आणि उच्च दर्जाचा आवाज येतो.

सध्या बऱ्याचशा मोबाइल कंपन्या त्यांच्या मोबाइलबरोबर इअरफोन देत नाहीत, परंतु या मोबाइलसोबत चांगल्या दर्जाचे इअरफोन देण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. तुम्हाला दोन अ‍ॅप एकाच वेळी वापरायचे असतील तर या मोबाइलमध्ये तशी सोय देण्यात आली आहे, उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा व्हिडीओ बघत असत तर त्याचबरोबर तुम्ही तुमचे मेसेजसुद्धा वाचू शकता. झेनफोन थ्री एस मॅक्समध्ये थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. हा मोबाइलमध्ये दोन सिमकार्डची सुविधा देण्यात आली आहे. यात तुम्ही दोन सिमकार्ड किंवा एक सिमकार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता, मेमरी कार्डचा वापर करून तुम्ही स्टोरेज टू टीबीपर्यंत वाढवू शकता. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल फोरजी व्हीओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजीला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे, शिवाय यात महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहे. या मोबाइलचे वजन १७५ ग्रॅम आहे. झेनफोन थ्री एस मॅक्स सोनेरी आणि काळा या दोन रंगांमध्ये तसंच ऑनलाइन उपलब्ध आहे.

फायदे
चांगली बॅटरी.
उत्कृष्ट फिंगरप्रिंट स्कॅनर.
उत्तम स्पीकर.
तोटे
जलद चार्जिग करत नाही.
फुल एचडी डिस्प्ले नाही.
या किमतीत आणखी चांगले पर्याय उपलब्ध.
झेनफोन थ्री एस मॅक्स
मोबाइल किंमत :
रु. १४,९९९/-
निखिल जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 10:37 am

Web Title: asus zenfone 3s max mobile review
Next Stories
1 प्लास्टिकमधील रसायनामुळे स्तनाच्या कर्करोगात वाढ
2 मिशेल ओबामांचा रिलॅक्स्ड लूक
3 मोटो जी ५ लाँच; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि उपलब्धता
Just Now!
X