आसुसचा फ्लॅगशिप झेनफोन 5 मालिकेतील सर्वात लोकप्रीय प्रिमियम फोन Asus ZenFone 5Z आज भारतात लॉन्च होणार आहे. बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लॉन्च केला जाणार आहे. दुपारी साडेबारापासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल, त्यानंतर विक्रीसाठी हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.

फ्लिपकार्टवर या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 29 हजार 999 रुपये असेल. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 36 हजार 999 रुपयांमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. याशिवाय आसुस कंपनीकडून फोन सादर करताना काही आकर्षक ऑफर दिल्या जाण्याची शक्यता आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन –
या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच फुलएचडी+ आयपीएस एलसीडी स्क्रीन (2246 x 1080 पिक्सल) आहे. स्नॅपड्रॅगन 845 ऑक्टा-कोर चिपसेट असलेला हा फोन 1.8 गीगाहर्ट्ज़वर कार्यरत राहील. ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 630 जीपीयू देण्यात आलं आहे. याशिवाय फोनमध्ये एआय प्रोसेसिंग क्षमता देण्यात आली आहे. फोनमध्ये अपर्चर एफ/1.7 सह 16 मेगापिक्सल प्रायमरी व अपर्चर एफ/1.8 के साथ 13 मेगापिक्सल सेकंडरी ड्यूल पिक्सल सेन्सरवाला ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. फोनचा कॅमेरा पीडीएएफ, ओआयएस आणि 4के व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओसाठी अपर्चर एफ/2.0 सह 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. आसुस झेनफोन 5झेड फोनचा आकारमान 153 x 75.65 x 7.7 मिलीमीटर आणि वजन 165 ग्रॅम आहे. अॅन्ड्रॉइड ओरियो बेस्ड जेनयूआयवर हा फोन काम करतो. फोनमध्ये झेनमोशन, सेल्फी मास्टर, गेम जेनी, मोबाइल मॅनेजर यांसारखे अनेक अॅप्स इन्स्टॉल आहेत. फोनमध्ये 3300 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.