करोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. करोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एसबीआयनं ग्राहकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यामांचा वापर करा असा सल्ला दिला आहे. डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून करोनाचा संसर्ग रोखण्याचा सल्ला एसबीआयनं दिला आहे.

पैशांची देवा घेवाण करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करा, असा सल्ला एसबीआयने ग्राहकांना दिला आहे. लॉकडाउनच्या काळात आवशकता नसेल तर एटीएमला जाणं टाळा असा सल्लाही दिला आहे. अशात जर एटीएमला जाणार असाल किंवा गेला असाल तर एसबीआयनं काही खास टिप्स दिल्या आहेत. त्या टिप्स वापरून करोनाचा संसर्ग रोखू शकतो, असंही एसबीआयनं म्हटलेय.

एटीएममध्ये गेल्यास या सात गोष्टींची काळजी नक्की घ्या –

– ATM मध्ये आधीच एखादा व्यक्ती पैसे काढत असेल तर तो बाहेर येईपर्यंत तुम्ही आत प्रवेश करू नका. सुरक्षित अंतर ठेवा.

– सॅनेटाझरने हात साफ ठेवा.

– ATM खोलीत इतर कशालाही स्पर्श करू नका.

– थंड,ताप, सर्दी आणि खोकला असेल तर ATM मध्ये जाणं टाळा।

– ATM खोलील खोकला आला तर रूमाल किंवा कोपऱ्यानं तोंड झाका करा.

– वापरेलला टिश्यू किंवा मास्क एटीएममध्ये सोडू किंवा टाकू नका.

– ATM मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड ऐवजी YONO चा वापर करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांसाठी लॉकडाउन घोषीत केला आहे. नागरिकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.