रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या आदेशानुसार बँकांनी स्वयंचलित टेलर मशिन्सवर अर्थात एटीएमवर शुल्क आकारू शकणार्‍या इंटरचेंज फी मध्ये वाढ केली आहे. १ ऑगस्टपासून २ रुपयांची वाढ दिसून येईल. आरबीआयने जूनमध्ये इंटरचेंज फी १५ ते १७ रुपयांनी वाढविली तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी फी ५ रुपयांवरून ६ पर्यंत वाढविण्यात वाढ केली. आरबीआयच्या मते, ही फी बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे देयकांसाठी (पेमेंटसाठी) केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून घेतली जाते. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र असतील.

काय आहेत बदल?

  • १ऑगस्ट २०२१ पासून, व्यावसायिक बँकांना सर्व व्यवहारांमध्ये १५  ते १७  रुपये व सर्व केंद्रांमधील बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी ५  रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढीस परवानगी दिली जाईल.
  • आरबीआयने बँकांना पुढील वर्षापासून मोफत मासिक परवानगी मर्यादेपलीकडे रोख आणि विना-रोकड एटीएम व्यवहारासाठी शुल्क वाढविण्यास परवानगी दिली आहे. “जास्त इंटरचेंज फी ची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सर्वसाधारण वाढ झाल्यास त्यांना ग्राहकांच्या शुल्कामध्ये प्रत्येक व्यवहारांसाठी २१ रुपये करण्याची परवानगी आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२  पासून लागू होईल”, असे आरबीआयने सांगितले.
  • रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की, बँक ग्राहकांनी मोफत व्यवहाराची मासिक मर्यादा ओलांडल्यास त्यांना १ जानेवारी २०२२  रोजी २० रुपयांऐवजी २१ रुपये प्रत्येक ट्राजेंक्शनसाठी द्यावे लागतील.
  • तथापि, बँक ग्राहक त्यांच्या स्वत: च्या बँक एटीएममधून दरमहा पाच विनामूल्य ट्राजेंक्शनसाठी पात्र आहेत.
  • त्याशिवाय मेट्रो शहरांमध्ये तीन व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच व्यवहार नि: शुल्क व्यवहारापलीकडे ग्राहकांच्या शुल्कावरील कमाल मर्यादा / कॅप प्रतिव्यवहार २० रुपये आहे. ग्राहक इतर बँकेच्या एटीएम उदा. नि: शुल्क व्यवहारासाठी (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह) पात्र आहेत.