19 September 2020

News Flash

ATM मधून एका दिवसात किती पैसे काढता येणार?, जाणून घ्या सर्व बँकांची मर्यादा

जाणून घेऊयात सध्या कोणत्या बँकच्या एटीएममधून दिवसाला किती पैसे काढू शकतो.....

( संग्रहीत छायाचित्र )

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये एटीएमचा लोकांना मोठा दिलासा आहे. एटीएममुळे बँकेच्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहणे टाळता येते. पण आज एसबीआयने आपल्या खातेदारांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कपात करत दिवसाला २० हजार केली आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपासून एसबीआय ग्राहकांना एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार रूपये काढता येणार आहेत. एसबीआयच्या या निर्णयानंतर इतर बँकही आपली मर्यादा कमी करण्याचा विचार करू शकतात. जाणून घेऊयात सध्या कोणत्या बँकच्या एटीएममधून दिवसाला किती पैसे काढू शकतो…..

पंजाब नॅशनल बँक –
प्लॅटिनम – प्रतिदिन ५० हजार रूपये (एका वेळेस फक्त १५ हजार)
क्लासिक – २५ हजार प्रतिदिन (एका वेळेस फक्त १५ हजार)

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – ICICI बँकेचे ग्राहक प्रतिदिन एटीएममधून ५० हजार रूपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. हाय नेटवर्थ इंडिव्हिजुअल्स (HNI) वाल्यासाठी ही मर्यादा एक लाख रूपये आहे.

एक्सिस बँक (Axis Bank)
बरगंडी कार्ड : प्रतिदिन तीन लाख रूपये
वेल्थ डेबिट कार्ड : प्रतिदिन दोन लाख
प्रायॉरिटी डेबिट कार्ड : प्रतिदिन एक लाख
ऑनलाइन रिवार्ड्स डेबिट कार्ड : प्रतिदिन ५० हजार
टाइटेनियम रिवार्ड्स डेबिट : प्रतिदिन ५० हजार
रिवार्ड्स+डेबिट कार्ड : प्रतिदिन ५० हजार

HDFC Bank –
HDFC बँक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची एटीएम कार्ड देते. याची मर्यादा ७५ हजार पासून एकला रूपयापर्यंत आहे.

Bank of Baroda – प्रतिदिन २५ हजार रूपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 5:48 pm

Web Title: atm limit of all bank
Next Stories
1 SBI खातेदारांना झटका, ATM मधून काढता येणार ‘इतकेच’ पैसे
2 रिझव्‍‌र्ह बँकेचे शुक्रवारी पतधोरण
3 स्वयंपाकाचा गॅसही महाग
Just Now!
X