बाजारात नवीन काय?

जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासात एक मोठी झेप घेतली. ऑडीने ऑडी ई-ट्रोन ५०, ऑडी ई-ट्रोन ५५ आणि ऑडी ई-ट्रोन स्पोर्टबॅक ५५ सादर केल्या.

ऑडी ई-ट्रोन ५० या मॉडेलची किंमत ९९ लाख ९९ हजार रुपये इतकी आहेत तर ऑडी ई-ट्रोन ५५ या कारची किंमत १ कोटी १६ लाख १५ हजार रुपये इतकी आहे, तर ऑडी ई-ट्रोन स्पोर्टबॅक ५५ या मॉडेलच्या कारची किंमत १ कोटी १७ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे.

फ्रंट आणि रेअर भागातील इलेक्ट्रिक मोटर्स २३० केडब्ल्यूची एकत्रित ऊर्जा तयार करतात.

ई-ट्रोन  ५५ आणि ई-ट्रोन स्पोर्टबॅक ५.७ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने गती गाठतात, तर ई-ट्रोन ५० ही ६.८ सेकंद ० ते १०० कि.मी. प्रति तास वेगाने गती गाठतात.

डिजिटल नकाशावर आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यात मदत मिळवा तसेच उपलब्ध चार्जरच्या क्षमतेच्या आधारे कार चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अचूक अंदाज मिळवा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

११ केडब्ल्यू पोर्टेबल एसी होम चार्जर हे तिन्ही कारसाठी देण्यात आले आहेत.  हे १५० केडब्ल्यू डीसी चार्जिंग करण्यास सक्षम आहे.

११ केडब्ल्यू पोर्टेबल चार्जर व्यतिरिक्त कॉम्प्लिमेंटरी वॉल वॉलबॉक्स चार्जर देखील मिळेल.

सिलेक्ट ऑडी इंडिया डीलरशिपमध्ये ५० केडब्ल्यू डीसी वेगवान चार्जर असेल. ग्राहक ऑडी इंडिया डीलरशिपमध्ये कॉम्प्लिमेंटरी चार्जिंग करू शकतात.

हिरो मोटोकॉर्पकडून माएस्ट्रो एज १२५ लाँच

स्कूटर विभागामधील गतिशील विकास धोरणाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आज प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशी नवीन माएस्ट्रो एज १२५ ही स्कूटर बाजारात आणली आहे. या नवीन स्कूटरमध्ये स्टाइल व तंत्रज्ञानाचे योग्य संयोजन आहे. नवीन स्कूटर सुधारित आकर्षकता, आधुनिक तंत्रज्ञान व आकर्षक डिझाइनसह कनेक्टेड व वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देते. प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प्स, संपूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, कॉल अलर्टस् व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे.

माएस्ट्रो एज १२५ ची किंमत ७२,२५०/- रुपये (ड्रम व्हेरिएण्ट) , ७६,५००/- रुपये (डिस्क व्हेरिएण्ट) आणि ७९,७५०/- रुपये (कनेक्टेड व्हेरिएण्ट) आहे. नवीन स्लीक हेडलॅम्पमधून उच्च कार्यक्षमता, दुप्पट प्रखर प्रकाश आणि रस्त्यावरील सुधारित व्हिजिबिलिटीसाठी दूरपर्यंत प्रकाश प्रसारित होण्याची खात्री मिळते.