लग्झरी कार बनवणारी जर्मनीची दिग्गज कंपनी Audi ने भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप एसयूव्ही-कूप Q8 लाँच केली आहे. ही गाडी खरेदी करणारा पहिला ग्राहक भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ठरलाय. तब्बल १. ३३ कोटी रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. ही फ्लॅगशिप एसयूव्ही केवळ पेट्रोल इंजिनसह एकाच व्हेरिअंटमध्ये बाजारात उतरवण्यात आलीये.

स्पीड –
ही ऑडी ५.९ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. कारचा जास्तीत जास्त वेग २५० किलोमीटर प्रति तास इतका आहे.

स्पेसिफिकेशन्स –
क्यू8 एसयूव्हीमध्ये मोठे ग्रिल, खास एलईडी हेडलाइट्स, कूपसारखी रूफलाइन, फ्रेमलेस डुअर आहे. कारच्या आतमध्ये लेटेस्ट ड्युअल-टचस्क्रीन कंट्रोल सिस्टिम आहे. इन्फोटेन्मेंट आणि नेव्हिगेशन फंक्शन्ससाठी 10.1-इंच स्क्रीन आहे. याच्या खाली दिलेली 8.1-इंचाची दुसरी स्क्रीन हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एसी सिस्टिमला कंट्रोल करते.

आणखी वाचा – Renault ची Duster झाली स्वस्त, किंमतीत 1.5 लाख रुपयांची कपात

इंजिन –
Audi Q8 मध्ये बीएस६ इंधन उत्सर्जन असलेल्या 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टिमसह 3.0 लीटर, V6 टर्बो – पेट्रोल इंजिन दिलंय. हे इंजिन 340hp ची ऊर्जा आणि 500Nm टॉर्क निर्माण करते. यात DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे.