जर्मनीची लक्झरी कार बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी ऑडीने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Audi E-Tron सादर केली आहे. या कारसाठी कंपनीने अॅमेझॉनसोबत भागीदारीही केली आहे. ऑडीच्या या कारची एलॉन मस्क यांच्या टेस्लासोबत थेट टक्कर असणार आहे.

(Photo – Reuters )

Audi E-Tron ही पूर्णतः SUV कार आहे. पुढील वर्षी अमेरिकेच्या बाजारात ही कार लॉन्च केली जाईल. त्यानंतर ही कार भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ऑडीने ही कार सादर केल्यापासून याबाबत चांगलीच चर्चा होती.

इलेक्ट्रीक गाड्यांच्या बाजारात आपला ठसा उमटवण्यासाठी ऑडीने ही कार आणली आहे. या कारसाठी कंपनीने अॅमेझॉनसोबत भागीदारी केली असून इलेक्ट्रीक चार्जिंगची सिस्टीम अॅमेझॉनवर विक्रीसाठी असेल, याशिवाय अॅमेझॉनकडून घरबसल्या मॅकेनिकची सुविधाही मिळेल.

72 हजार 925 रुपये या चार्जिंग सिस्टीमची किंमत असेल. एकदा फूल चार्ज केल्यानंतर 400 किमीचा प्रवास करता येईल असं सांगितलं जात आहे. कारमध्ये 95 kWh लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली असून अवघ्या 30 मिनिटांमध्ये 80%चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. कारमध्ये दोन पावरफुल इलेक्ट्रिक मोटार असून high-voltage technology कार चालवण्याचा एक शानदार अनुभव मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे. 55 ते 56 लाखांच्या आसपास या कारची किंमत असेल.