News Flash

ऐकावं ते नवलच! जगातली पहिली हवेत उडणारी कार तुम्ही पाहिलीत का?

ऑस्ट्रेलियामधील अलाउडा एरोनॉटिक्स या कंपनीने जगातली पहिली हवेत उडणारी रेसिंग कार बनवली आहे. Alauda Airspeeder Mk3 असं या कारचं नाव आहे.

जगातली पहिली उडणारी कार! (Photo : Airspeeder/YouTube)

बॉलीवूडमधल्या काही कॉमेडी व अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये आकाशात उडणाऱ्या कार तुम्ही पाहिल्या असतील. चित्रपटातली ही दृष्य पाहताना खरंच हे सर्व रिअल आयुष्यात घडलं तर? अशी कल्पना एकदातरी तुमच्या मनात डोकावलीच असेल. हो ना! सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अशीच हवेत उडणारी एक कार चर्चेचा विषय बनली आहे. ही रेसिंग कार असून ती रेसिंग ट्रॅकवर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावते आणि हवेत उडते देखील! आहे ना कमाल!

ऑस्ट्रेलियामधील अलाउडा एरोनॉटिक्स या कंपनीने जगातील पहिली हवेत उडणारी Alauda Airspeeder Mk3 ही रेसिंग कार तयार केली आहे. सध्या सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांची चर्चा सर्वत्र होताना दिसते. काही वर्षांपूर्वी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आपल्या गाडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ऑटोमॅटिक गाडी चालत असल्याचे दिसत होते.

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. आणि याला ऑटोमोबाईल क्षेत्रही अपवाद ठरलेले नाही. अलाउडा एरोनॉटिक्स कंपनीने या कारला फेब्रुवारीमध्ये जगासमोर आणले होते. नुकतीच दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये Alauda Mk3 फ्लाइंग कारची यशस्वी टेस्टिंग करण्यात आली. या वेळी काही सेकंदातच ही कार जमिनीपासून ५०० मीटर उंचीवर जाऊन स्थिरावली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 10:23 pm

Web Title: australia based airspeeder planning to launch aircar mrs 92
Next Stories
1 सॅमसंगचा डबल धमाका! Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 लवकरच लाँच होणार!
2 चांदी काळी पडते? मग या टिप्स वापरा आणि घरातल्या घरात चमकवा चांदीच्या वस्तू
3 झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
Just Now!
X