जगातील आघाडीचं सर्च इंजिन गुगलला ऑस्ट्रेलियाच्या सरकारने फटकारलं आहे. गुगलच्या सर्च रिझल्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या न्यूज वेबसाइट्स दिसत नसल्याचं समोर आल्यानंतर सरकारने गुगलवर ताशेरे ओढलेत.

‘ऑस्ट्रेलियातील काँटेंट ब्लॉक करण्यापेक्षा त्या काँटेंटसाठी पैसे किंवा मोबदला देण्याचा विचार करावा’ अशा शब्दात ऑस्ट्रेलियाच्या सरकारने गुगलला सुनावलंय. तर, ऑस्ट्रेलियाच्या न्यूज आउलेट्ससाठी आपली सर्व्हिस व्हॅल्यू ठरवण्याचा प्रयोग सुरू आहे असं गुगलने म्हटलंय. टेस्टिंगमुळे एक टक्के ऑस्ट्रेलियाच्या युजर्सवर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय, फेब्रुवारीपर्यंत हे काम संपेल असंही कंपनीने सांगितलं.

ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच गुगल आणि फेसबुकला मीडिया कंपन्यांच्या ज्या बातम्या वापरल्या असतील त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने संसदेत यासंबंधित एक विधेयक आणलं आहे. त्यामुळे गुगल आणि फेसबुकला ऑस्ट्रेलियामध्ये बातम्यांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुक आणि गुगलने ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तावित कायद्याचा तीव्र विरोध केला आहे. हा कायदा अस्तित्वात आला तर ऑस्ट्रेलियातील युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर बातम्या शेअर करण्यापासून रोखू, असा इशारा फेसबुकने यापूर्वीच दिला आहे. तर गुगलनेही मोफत सेवा वापरता येणार नाहीत असा इशारा याआधीच दिलाय. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संसदेत सध्या नवीन कायद्याबाबबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर मतमोजणी होण्याची शक्यता आहे.