अनेकांना वजन जास्त असल्याच्या समस्येने ग्रासलेले असते. त्यासाठी डाएटिंगसह इतर उपाय केले जातात, पण वजन कमी करण्यासाठी अ‍ॅव्होकाडो फळाचे सेवन करणे फायद्याचे ठरते, असा दावा संशोधकांनी केला आहे. अ‍ॅव्होकाडोयुक्त अन्नाने पोषके तर मिळतातच, शिवाय वजन कमी होते. यात बॉडी मास इंडेक्स व कंबरेचा घेरही कमी  होतो. ‘जर्नल इंटरनल मेडिसिन रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटल्यानुसार अ‍ॅव्होकाडोच्या सेवनाने इतरांच्या तुलनेत वजन साडेतीन किलोंनी कमी राहते. बीएमआय एक अंकाने कमी राहतो तर कंबरेचा घेर सरासरीपेक्षा १.२ इंचांनी कमी राहतो. अमेरिकेतील लोक अ‍ॅव्होकाडोचे सेवन नियमितपणे करीत असतात व त्याला भाज्यांची जोड असते, असे हॅस अ‍ॅव्होकाडो बोर्डाचे पोषण संचालक निक्की फोर्ड यांनी सांगितले.

रोजच्या जेवणाचा भाग म्हणून अ‍ॅव्होकाडोचा समावेश करावा अशी आमची शिफारस आहे असे त्यांनी सांगितले. अ‍ॅव्होकाडो सेवन करणाऱ्या लोकांचे वजन जास्त असण्याची शक्यता ३३ टक्क्यांनी कमी असते, तर कंबरेचा घेर जास्त असण्याची शक्यता ३२ टक्क्यांनी कमी असते. मेटॅबोलिक सिंड्रोम अ‍ॅव्होकाडोमुळे कमी होतो. अ‍ॅव्होकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अ‍ॅव्होकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते. होमोसिस्टीन वाढल्यास हृदयविकार होतो.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग