News Flash

वजन घटवण्यात अडचणी आणणाऱ्या ‘या’ गोष्टी टाळा

वेळीच लक्ष देणे गरजेचे

प्रातिनिधिक छायाचित्र

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी पोटाचा वाढता घेर किंवा स्थूलपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांसाठी महत्त्वाची समस्या असणाऱ्या या लठ्ठपणावर नेमके कोणते उपाय करता येतील याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. पोटाचा घेर कमी करायचा असल्यास योग्य डाएट आणि व्यायाम आवश्यक असतो. रोजच्या धावपळीत या व्यायामालाही वेळ नाही अशी अनेकांची तक्रार असते. पण योग्य आहार आणि व्यायाम याला पर्याय असूच शकत नाही. तसेच जीवनशैलीमध्येही काही बदल करणे आवश्यक असून त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यात उद्भवणारे त्रास कमी होण्याची शक्यता असते. पाहूयात कोणत्या उपायांनी तुम्ही लठ्ठपणावर मात करु शकाल.

वजन घटविण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणणाऱ्या गोष्टी

अपुरी झोप

आरोग्य उत्तम रहावे यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते असे आपण नेहमी ऐकतो. मात्र प्रत्यक्षात मात्र आपली झोप पुरेशी होत नाही. व्यक्तीला उत्तम आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. पण नियमितपणे याहून कमी झोप होत असेल तर त्याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. लठ्ठपणा हा त्यातीलच एक महत्त्वाचा परिणाम आहे.

दिर्घकाळ भुकेले राहणे

अनेकांना काही कारणामुळे दिवसातील बराच वेळ बाहेर रहावे लागते. अशावेळी तुम्ही घरुन जास्त डबे नेऊ शकत नसाल तरीही भुकेले राहणे आरोग्यासाठी चांगले नसते. बाहेरचे खावे लागते म्हणून किंवा अन्य काही कारणांनी अनेक जण भूक मारतात. महिलांमध्ये असे करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र वारंवार भूक मारल्याने लठ्ठपणा वाढतो.

रात्रीचे जेवण लवकर करणे

रात्री लवकर जेवावे असे अनेकांकडून सांगितले जाते. संध्याकाळी ७ च्या दरम्यान जेवणे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हटले जाते. मात्र ७ वाजता जेऊन झोपायला जर १२ वाजणार असतील तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी लवकर जेवत असाल तर ते चांगलेच आहे. पण त्यासोबतच वेळेत झोपणेही गरजेचे आहे.

शरीराचे म्हणणे ऐका

आपले शरीर कायम आपल्याशी संवाद साधत असते. कधीतरी बाहेरचे खाणे किंवा एखादवेळी खूप थकवा असेल तर व्यायाम न करणे यांसारख्या गोष्टी घडू शकतात. शरीराला व्यायामाची आणि वेगळे काही करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट ओढूनताणून न करता शरीराच्या म्हणण्याप्रमाणे करायला हवी. तरच त्याचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी जास्त चांगला उपयोग होईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:18 pm

Web Title: avoid some things for loosing weight changing lifestyle is necessary
Next Stories
1 Gudi Padwa 2018 : असा साजरा झाला सातासमुद्रापार गुढीपाडवा
2 शुक्राणूंच्या कमतरतेने आजारपणाचा धोका अधिक
3 Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी
Just Now!
X