लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत जनजागृतीची गरज आहे. यासाठी नवी दिल्लीतील ‘कॅन किड्स’ या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्याबाबत मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत बालकांमध्ये असणाऱ्या कर्गरोगाशी अधिक प्रभावीपणे सामना करण्यासाठी अनेक योजना तयार करण्यात येणार आहेत.

‘गो गोल्ड’ असे या मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेसाठी बालकांमधील कर्करोगाचे प्रतीक म्हणून सोनेरी रंगाची रिबीन वापरण्यात येणार आहे.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

सप्टेंबर महिना हा बालकांमधील कर्करोगाबाबत जनगागृती महिना म्हणून साजरा केला जात असल्याने या मोहिमेची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे. या मोहिमेंतर्गत आग्रा ते नोएडा, लखनऊ, अलाहबाद आणि कानपूर या शहरांत पाच दिवसांची मोटार फेरी काढण्यात येणार आहे. या रॅलीतून बालकांमधील कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संस्थेच्या अहवालानुसार भारतात बालकांमधील कर्करोगाचे प्रमाण २० टक्के आहे. मोठय़ांमधील कर्करोगाच्या तुलनेत बालकांमधील कर्करोगाकडे जास्त दुर्लक्ष केले जाते, असे संस्थेचे म्हणणे आहे. या मोहिमेद्वारे रुग्णालये, परिचारिका, पालक, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे या संस्थेच्या अध्यक्ष पूनम बैग यांनी सांगितले. देशात ४० टक्के मुले कर्करोगातून बरी होतात. हे प्रमाण संपूर्ण जगाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)