News Flash

करोनातून बरं होण्यासाठी आयुर्वेद करु शकतं मदत; जाणून घ्या तीन टिप्स

"कोविड-१९" या आजाराशी झुंज देत असलेल्या रुग्णांनी आयुर्वेदातील या तीन टिप्स करोनातून बरे होण्याकरिता मदत करतील.

कोविड-१९ या आजाराशी झुंज देत असलेल्या रुग्णांनी आयुर्वेदातील या तीन टिप्स करोनातून बरे होण्याकरिता मदत करतील.

करोनाने सध्या जगभरात थैमान घातला असून लसीकरण सुरु असलं तरीदेखील आरोग्य विभागापुढे अनेक मोठी आव्हानं आहेत. करोनातून बरं होण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान करोना झाला असल्यास त्यातून बरं होण्यासाठी आयुर्वेदाचीदेखील मदत घेतली जाऊ शकते. आयुर्वेदातील या तीन टिप्स करोनातून बरं होण्याकरिता मदत करु शकतात.

डॉक्टर दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या टीप्स सुचवल्या आहेत. “अनेक करोना रुग्ण बरे होत आहे. करोनावर मात करण्यासाठी औषधं, उपचार करणे महत्वाचे आहेच, पण त्याचसोबत आयुर्वेदातदेखील असे काही मार्ग आहेत जे करोना रुग्णांना बरे करू शकतात”. तर जाणून घेऊयात डॉ. दीक्षा भावसार यांनी सांगितलेल्या आयुर्वेदातील पहिल्या तीन महत्वाच्या टिप्स.

* गरम पाण्याची वाफ घेणे:

५०० मिली पाणी घेऊन त्यात दोन चमचे ओवा, एक चमचे हळद, तुळशीची पाने , पुदिण्याची पाने टाका. हे पाणी १० ते १२ मिनिटं उकळून घ्याव आणि १० मिनिटं वाफ घ्या. असे दिवसातून किमान चार ते पाच वेळा करा.

* गुळण्या करणे:

गुळण्या करण्यासाठी २००-३०० मिली पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून पाच मिनिटं पाणी उकळ्वून घ्या. पाणी कोमट झाले की गुळण्या करा ज्यामुळे घशातील विषाणू नष्ट होतील आणि रोग प्रतिकारशक्ती वाढेल. जर तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा अशा गुळण्या केल्यास घशासंबंधी आजार होणार नाही.

* प्राणायाम:

अनुलोमा विलोमा, भ्रामरी, भस्त्रिका आणि कपालभाती हे प्राणायाम केल्याने करोनारुग्ण शारीरिकदृष्ट्या स्थिर व मानसिकदृष्ट्या चांगले राहू शकतात. दरम्यान दिवसातून दोन व तीन वेळा या प्राणायामांचा दहा मिनिटं सराव करा. तसेच हे प्राणायाम तुम्ही रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यानंतर तीन तासाने करावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

डॉक्टरांच्या औषधोपचारासोबतच आयुर्वैदातील या तीन गोष्टी नियमित केल्याने करोनारुग्ण लवकर बरे होऊ शकतात असं डॉ. दीक्षा भावसार यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:58 pm

Web Title: ayurvedic suggests top three tips for quick covid recovery scsm 98
Next Stories
1 तेच तेच काढे पिऊन कंटाळा आला असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही रेसिपी ट्राय करा
2 नियोजन आहाराचे : आहार गवंडीकाम करणाऱ्यांचा
3 पावसाळ्यातील आहार
Just Now!
X