पाश्चिमात्य आहारात असलेल्या मेद तसेच साखरेमुळे लहान आतडय़ात काही जिवाणूंची वाढ होऊन ते मेद शोषून घेतात, असे अभ्यासात म्हटले आहे. जर्नल होस्ट अँड मायक्रोब या नियतकालिकाने म्हटले आहे, की यात कोणत्या प्रकारचे जिवाणू सहभागी असतात याचा अभ्यास मिडवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. यात मेद शोषून घेण्यात यातील जिवाणूंचा संबंध असतो. यात उंदरांवर काही प्रयोग करण्यात आले असता काहींना जिवाणूमुक्त अन्न देण्यात आले, तर काहींना जिवाणूयुक्त अन्न देण्यात आले. ज्यांना जिवाणूमुक्त अन्न देण्यात आले त्यांच्यात लठ्ठपणा वाढलेला दिसला, कारण त्यांच्यात चरबी शोषली गेली नाही. जेव्हा काही उंदरांना मायक्रोबायोटा देण्यात आले. त्यावेळी त्यांच्यात चरबी शोषली गेली, असे क्रिस्टिना मार्टिनेझ यांचे म्हणणे आहे. हे जिवाणू पचनासाठी लागणारी वितंचके लहान आतडय़ात तयार करतात. ते आहारातील चरबीचे विघटन करून ती शोषण्यास उपयुक्त असतात. जिवाणूंपासून तयार केलेले काही पदार्थ मेदाचे शोषण करण्यास मदत करतात, असे दिसून आले आहे. आतापर्यंतचा बराच अभ्यास हा मोठय़ा आतडय़ाशी संबंधित होता. आताच्या अभ्यासात लहान आतडय़ातील मायक्रोबायोटाशी संबंध आहे.

लहान आतडय़ात स्थूल पोषकांचे शोषण होत असते. जे अन्न आपण खातो त्यातून कोणते जिवाणू आतडय़ात असणार हे ठरते, त्यामुळे जिवाणू हे चयापचयावर थेट परिणाम करतात. परिणामी मेटॅबोलाइट्स, प्रिबायोटिक्स व पोस्ट बायोटिक्स यांचा वापर केल्यास क्रॉन्स डिसीज व इतर रोगात उपयोग होऊ शकतो, त्यामुळे लठ्ठपणाही कमी करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.