लहान मुलांची पाण्यातील खेळणी म्हणजे रोगजंतूंचे आगार असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. विशेषत: आंघोळीच्या टब किंवा बादलीत खेळण्याची रबरी बदके किंवा त्यासारखी खेळणी रोग उत्पन्न करणाऱ्या जिवाणूंनी भरलेली असतात. त्यातून डोळे, कान आणि पोटाचे आजार उद्भवू शकतात, असे या संशोधनात दिसून आले.

अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठ, स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ एक्वेटिक सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आणि ईटीएच झुरिच यांनी हे संशोधन केले.

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

या संशोधनाचे निष्कर्ष एन पी जे बायोफिल्म्स अ‍ॅण्ड मायक्रोबायोम्स या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. या अभ्यासात १९ प्रकारची खेळणी तपासून पाहण्यात आली. संशोधनात आढळले की, रबरी बदके ही किटाणूंच्या पैदाशीची मुख्य आगारे आहेत.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसले की, दर पाचपैकी चार बदकांमधील पाण्यात लेजिओनेला आणि सुडोमोनास एरोजिनोजा यांसारखे जिवाणू मोठय़ा प्रमाणावर असतात. ते साधारणत: रुग्णालयांतून प्रसार होणाऱ्या संक्रमणांशी संबंधित आहेत. या रबरी बदकांमध्ये दर चौरस सेंटिमीटर क्षेत्रफळात ७५ दशलक्ष जिवाणू सापडले. हे प्रमाण खूप घातक असल्याचे संशोधकांनी सांगितले. याविषयीचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आले आहे.

खेळण्यांसाठी वापरलेल्या पॉलिमरमधून कार्बन उत्सर्जन होत असल्याने जिवाणूंना खाद्य मिळते. तसेच आंघोळीच्या घाण पाण्यातूनही जंतू खेळण्यांवर साचतात. अधिक चांगल्या प्रतीचे पॉलिमर्स वापरले तर ही समस्या कमी होऊ शकते असे शास्त्रज्ञांना वाटते.