लॉकडाउनमुळे सर्वजण घरीच आहेत. दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रत्येकाचा विचार असतो. स्वयंपाकमध्ये दररोज नवनवीन पदार्थ करून जिभेचे चोचले भागवले जात आहेत. यामुळेच घरीच्या घरी तयार करून नवीन पदार्थ खायचे असतील तर चविष्ट बदाम बर्फी करा….

साहित्य

* खवा- एक ते अर्धा कप

*  पिस्ता, अंजीर, अक्रोड (बारीक तुकडे करून)- अर्धा कप

*  वाळवलेली फळे- अर्धा कप

* वेलची पावडर- पाव चमचा

* जायफळ पावडर- एक ते दोन चिमूट

कृती :

* खवा, सुक्या मेव्याचे तुकडे एका कढईमध्ये घेऊन मंद आचेवर हलवत राहावे.

* काही वेळानंतर वाळवलेली फळे, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून चांगले हलवावे.

* भांडय़ाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून एकसारखे करावे आणि थंड होऊ द्यावे.

* थंड झाल्यानंतर वडय़ा पाडाव्यात.

वैशिष्टय़े

*  सुक्या मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. उदा. ई जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लाहे इत्यादी.

* चवीस उत्तम. आबालवृद्धांना उपयुक्त.

* साखर नसल्याने मधुमेही व्यक्तीही खाऊ शकतात. (प्रमाणात)

* लहान मुलांसाठी अतिशय उत्तम.