बजाज ऑटोची एंट्री-लेवल ‘क्रूजर’ बाइक Bajaj Avenger Street 160 महाग झाली आहे. कंपनीने या बाइकच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत वाढ झाल्यानंतर आता Avenger Street 160 ची किंमत 95 हजार 891 रुपये झाली आहे. बीएस-6 मॉडेलमध्ये एप्रिल महिन्यात लाँच झाल्यापासून दुसऱ्यांदा या बाइकचिया किंमतीत वाढ झाली आहे.

किंमतीतील बदलाशिवाय बाइकच्या डिजाइन, फीचर्समध्ये बदल झालेला नाही. 5-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या Avenger Street 160 मध्ये फ्युअल-इंजेक्शन सिस्टिमसह 160cc, सिंगल-सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 14.8 bhp ची पॉवर आणि 7,000 rpm वर 13.7 Nm टॉर्क निर्माण करतं.

(देशातील सर्वात स्वस्त कार! छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन, किंमत फक्त….)

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन :-
या बाइकच्या पुढील बाजूला 280 mm डिस्क आणि मागे 130 mm ड्रम ब्रेक आहे. बाइकमध्ये सिंगल चॅनेल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) फीचरही आहे. सस्पेन्शनसाठी पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये 5-स्टेप अॅड्जस्टेबल ट्विन शॉक अॅब्जॉर्बर सस्पेन्शन आहेत. या बाइकचं वजन 156 किलोग्रॅम असून ब्लॅक आणि रेड अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

 स्वस्त क्रूजर बाइक :-
किंमतीत वाढ झाल्यानंतरही Avenger Street 160 देशातील सर्वात स्वस्त एंट्री-लेवल क्रूजर बाइक म्हणून कायम आहे. याशिवाय बजाजने जवळपास आपल्या सर्व बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये पल्सर 150, पल्सर NS200, पल्सर 180F, CT100, CT110 आणि प्लॅटिना 100 या बाइक्सचा समावेश आहे.