सुमारे तीन दशकांपूर्वीपासून भारताच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी बजाज ऑटोची चेतक ही स्कूटर आता पुन्हा एकदा धावण्याच्या तयारीत आहे. बुधवारी दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये बजाज ऑटोने Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केली. ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे. भारतीय बाजारात चेतकची टक्कर Ather 450 आणि Okinawa Praise यांसारख्या स्कूटरशी होईल. चेतक सादर करतेवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि Niti आयोगचे सीईओ अमिताभ कांत हेही उपस्थित होते. त्यानंतर चेतक इलेक्ट्रिक यात्रा काढण्यात आली, या यात्रेला गडकरींनी हिरवा झेंडा दाखवला.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नव्या चेतक इलेक्ट्रिकमध्ये Eco आणि Sport मोड देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये कंपनीने अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) सारख्या फीचर्सचा समावेश केला आहे. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः आधुनिक झालीये. सप्टेंबर महिन्यापासून कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पामध्ये या स्कूटरचं प्रोडक्शन घेण्यास सुरूवात झाली आहे. पण पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कंपनी ही स्कूटर लाँच करणार आहे. त्याचवेळी स्कूटरच्या किंमतीबाबतही घोषणा केली जाईल. टप्प्याटप्प्याने ही स्कूटर देशभरात लाँच केली जाणार आहे. आता केवळ ही स्कूटर सादर करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुणे आणि बेंगळुरूमध्ये ही स्कूटर रोलआऊट केली जाईल, त्यानंतर प्रो-बाइकिंग नेटवर्कद्वारे स्कूटरची विक्री होईल.

या स्कूटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर केला जाईल, म्हणजेच यातील बॅटरी पोर्टेबल नसेल. विविध सहा रंगामध्ये ही स्कूटर सादर करण्यात आली आहे. यात lithium-ion बॅटरी देण्यात आली असून स्टँडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे. मोनोशॉक सस्पेंशन यामध्ये दिलं असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत. इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरची रेंज, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.

देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा १९७२ मध्ये लॉन्च केली होती. सुमारे 34 वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली होती. कारण, तोपर्यंत ऑटोमॅटिक स्कूटर्सने बाजारावर कब्जा केला होता. ही स्कूटर सुरुवातीला लॉन्च करण्यात आली त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. तसेच या स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते. या स्कूटरमध्ये कंपनीने 145 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले होते. जे 7.5 बीएचपी पावर देत होते तसेच 10.8 एनएमचा टार्क ते निर्माण करीत होते.