सुमारे तीन दशकांपूर्वीपासून भारताच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी बजाज ऑटोची चेतक ही स्कूटर आता पुन्हा एकदा धावण्याच्या तयारीत आहे. बजाज ऑटोकडून 16 ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली जाणार आहे. यासाठी कंपनीकडून माध्यमांना निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे.

कंपनीकडून पाठवलेल्या निमंत्रणात “हमारा कल” या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. यात ‘हमारा’ शब्द ‘बजाज चेतक’ला संबोधित करतो. तर ‘कल’चा अर्थ भविष्यातील गाडी असा होता. चेतक स्कूटर सुरुवातीला लॉन्च करण्यात आली त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून बजाज आपली सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर चेतक पुन्हा लाँच करणार असल्याची चर्चा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या फिचर्ससह रिलॉन्च केली जाणार असल्याची चर्चा ऑटोमोबाईल बाजारात सुरु आहे. अशातच १६ तारखेला बजाजची नवी स्कूटर लाँच होत असल्याने ही चेतक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्कूटरच्या मॉडेलचं नाव ‘अर्बानाइट’ देखील असू शकतं. या नव्या स्कूटरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : Toyota Glanza 24 हजारांनी स्वस्त, नवीन व्हेरिअंट लाँच

कशी असेल नवी चेतक –
चेतकच्या रिलाँचबाबत कंपनीने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली नसली तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या स्कूटरमध्ये १२५ सीसी क्षमतेच्या इंजिनाचा प्रयोग करण्यात येऊ शकतो. त्याशिवाय यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. नव्या चेकमध्ये युएसबी चार्जिंग पोर्ट, ब्लुटूथ केनेक्टिव्हीटी आणि कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टिमचा प्रयोग करण्यात येऊ शकतो.
देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा १९७२ मध्ये लॉन्च केली होती. सुमारे ३४ वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर २००६ मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली होती. कारण, तोपर्यंत ऑटोमॅटिक स्कूटर्सने बाजारावर कब्जा केला होता.

ही स्कूटर सुरुवातीला लॉन्च करण्यात आली त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. तसेच या स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते. या स्कूटरमध्ये कंपनीने १४५ सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले होते. जे ७.५ बीएचपी पावर देत होते तसेच १०.८ एनएमचा टार्क ते निर्माण करीत होते.