News Flash

आली बजाजची नवीन Platina , एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 96 किमी माइलेज

प्लॅटिना आली 'इलेक्ट्रिक स्टार्ट-डिस्क ब्रेक' मॉडेलमध्ये...

(संग्रहित छायाचित्र)

दुचाकी बनवणारी देशातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोने आपली लोकप्रिय बाइक Bajaj Platina 100 एका नवीन ‘इलेक्ट्रिक स्टार्ट-डिस्क ब्रेक’ या व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. नवीन बाइकच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ही बाइक 96.9 किलोमीटर प्रतिलीटर माइलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

मार्केटमध्ये प्लॅटिना बाइक आधीपासून दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होती. पण, आता Platina 100 ES या डिस्क ब्रेक व्हेरिअंटसह एकूण तीन व्हेरिअंट झाले आहेत. नवीन प्लॅटिनाची एक्स-शोरुम किंमत 59,373 रुपये ठेवण्यात आली आहे. तर अन्य दोन व्हेरिअंट Platina 100 आणि Platina KS अॅलॉय ड्रम ब्रेकच्या किंमती अनुक्रमे 49,261 रुपये आणि 55,546 रुपये आहे.

नवीन आणि जुन्या व्हेरिअंटमध्ये केवळ ब्रेकचा फरक आहे. नवीन बाइकच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तर, अन्य दोन व्हेरिअंटमध्ये ड्रम ब्रेक आहेत. हे नवीन व्हेरिअंट फक्त इलेक्ट्रिक स्टार्ट व्हर्जनमध्येच उपलब्ध असेल. याशिवाय डिझाइन आणि अन्य फीचर्स ड्रम ब्रेक व्हेरिअंटप्रमाणेच आहेत. बजाज प्लॅटिनामध्ये 4-स्पीड गिअरबॉक्सच्या पर्यायांसह बीएस6 कम्प्लायंट 102cc, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 7,500rpm वर 7.9bhp ची पॉवर आणि 5,500rpm वर 8.34Nm टॉर्क निर्माण करतं. बाइकचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास असून माइलेज 96.9 किलोमीटर प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:44 pm

Web Title: bajaj platina 100 disc variant launched priced at rs 59373 get details sas 89
Next Stories
1 21 जुलैला लाँच होणार OnePlus चा ‘स्वस्त’ फोन , 499 रुपयांत प्री-बुकिंगला होणार सुरूवात
2 फक्त एका मिनिटात Sold Out झाले ‘वनप्लस स्मार्ट टीव्ही’, कंपनीचा दावा
3 Redmi Note 9 Pro Max चा आज ‘फ्लॅश सेल’, मिळतील शानदार ऑफर्स
Just Now!
X