News Flash

‘Dagger Edge’ व्हर्जनमध्ये आली नवीन Bajaj Pulsar 150, Pulsar 180 आणि 220F ; किंमत…

तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेली पल्सर आता Dagger Edge एडिशनमध्ये

(फोटो सौजन्य : @allplacesmap ट्विटर अकाउंट)

बजाज ऑटोने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय पल्सर रेंजच्या बाइक्स नवीन ‘Dagger Edge’ व्हर्जनमध्ये लाँच केल्या आहेत. कंपनीकडे पल्सर रेंजमध्ये Pulsar 150, Pulsar 180 आणि Pulsar 220F यांसारख्या बाइक्स आहेत. बजाज ऑटोने आता तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या पल्सरचे तिन्ही मॉडेल्स Dagger Edge एडिशनमध्ये भारतीय बाजारात उतरवले आहेत. तिन्ही मॉडेल्सबाबत सविस्तर जाणून घेऊया :-

Pulsar 150 Dagger Edge इंजिन आणि किंमत :-

Pulsar 150 Dagger Edge भारतीय बाजारात पर्ल व्हाइट आणि सफायर ब्लू असा दोन रंगांत उपलब्ध आहे. यात बीएस-6 निकषांसह 149.5 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 6,500 आरपीएमवर 13.8 bhp पॉवर आणि 6,500 आरपीएमवर 13.25 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्सही आहेत. Pulsar 150 Dagger Edge ची बेसिक दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे. तर, याच्या ड्युअल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1.05 लाख रुपये आहे.

Pulsar 180 Dagger Edge इंजिन आणि किंमत :-

Pulsar 180 Dagger Edge पर्ल व्हाइट, वोल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे. यात निरनिराळ्या हायलाइट्स आणि ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पॉवरसाठी बीएस-6 कम्प्लायंट 178.6 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500 आरपीएमवर 16.76 bhp मॅक्सिमम पॉवर आणि 6,500 आरपीएमवर 14.52 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्सही आहेत. Pulsar 180 Dagger Edge एडिशनची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे.

Bajaj Pulsar 220F Dagger Edge इंजिन आणि किंमत :-

Bajaj Pulsar 220F Dagger Edge एडिशन भारतीय बाजारात चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात पर्ल व्हाइट, सफायर ब्लू, वोल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लॅक अशा चार रंगांचा समावेश आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत ही बाइक Bajaj Pulsar 220F प्रमाणेच असेल. यामध्ये बीएस-6 कम्प्लायंट 220 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500 आरपीएमवर 20.11 bhp ऊर्जा आणि 7,000 आरपीएमवर 18.55 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या Pulsar 220F Dagger Edge एडिशनची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.28 लाख रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 3:55 pm

Web Title: bajaj pulsar dagger edge edition launched in india check price list and other details sas 89
Next Stories
1 Samsung चा नवीन 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, ‘मिडरेंज’ सेगमेंटमध्ये दमदार फिचर्स
2 करोना संकटात Maruti Suzuki चा मदतीचा हात, रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी घेतला मोठा निर्णय
3 स्मार्ट वाहतूक..
Just Now!
X