News Flash

बालुचारी साडीविषयी माहितीये? 

साडीची खास वैशिष्ट्ये

प्रातिनिधिक छायाचित्र

बालुचारी साडी किंवा बालुचार साडी ही भारतात आणि विशेष म्हणजे बांग्लादेशातही नेसली जाते. मुळची बंगालची असलेली ही साडी पदरावर असलेल्या पौराणिक कथांच्या प्रतिकृतीसाठी प्रसिद्ध आहे. ही साडी मुख्यत: मुर्शीदाबाद या ठिकाणी बनवली जात असे. परंतु आजकाल बिष्णुपूर आणि बंगालच्या आसपासच्या प्रदेशातही या साडीचे उत्पादन केले जाते.सुमारे २०० वर्षांपुर्वी ही साडी पहिल्यांदा मुर्शीदाबाद जिल्ह्यातील बालुचार या गावात विणली गेली, ज्यावरून तिला बालुचारी हे नाव देण्यात आले.

१८ व्या शतकात बंगालचा नवाब, मुर्शीदकुली खान याने या साडीचे महत्व ओळखून ही कला ढाकामधून बालुचार मध्ये आणली. बालुचार साडी किंवा स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले नाव बालुचुरी साडीवर विशेषत: रामायण व महाभारतातल्या कथांची चित्रे किंवा प्रतिकृती विणलेली असते. मुघल आणि इग्रजांच्या काळात या साडीच्या पदरावर चौकोनी नक्षीकाम असायचे. यामध्ये कोयरीचे आकार तसेच नवाबांच्या जीवनशैलीची प्रतिकृती असे. ही एक साडी विणायला कमीत कमी एका आठवड्याचा कालावधी लागतो. बालुचारी साडी फारशा प्रकारांमध्ये उपलब्ध नसली तरी विणण्याच्या प्रकारावरून साडीला तीन नावे देण्यात आली आहेत.

१. बालुचारी/बालुचुरी : बहुतेकशा बालुचारी साड्यांमध्ये १ किंवा २ रंग वापरून ती साडी विणली जाते.

२. बालुचारी (मीनाकारी) :काही वेळा १ किंवा २ रंग वापरून विणलेल्या या साडीवर मीनाकारी काम केलेले असते. यामुळे ही साडी अजून उठून दिसते.

३. स्वर्णचारी/स्वर्णचुरी :सोनेरी व कधीकधी चंदेरी रंगाच्या धाग्यांनी विणलेली बालुचारी साडी सगळ्यात सुंदर दिसते. या प्रकारात नक्षीकाम मोठ्या प्रमाणात केलेले असते.

बालुचारी साडी ही मुख्यत: उच्चवर्गीय स्त्रियांमध्ये प्रसिद्ध आहे. बंगालमधील जमिनदार आणि श्रीमंत घराण्यांतील स्त्रियांकडे ही साडी हमखास दिसून येते. गडद लाल, गुलाबी, हिरवा अशा रंगात ही साडी मिळते. आजकाल पर्यावरणहिताच्यादृष्टिने धाग्यांना रंग देण्यासाठी नैसर्गिक वस्तू वापरल्या जातात. जसे की, केळीची पाने, कडिलिंबाची पाने, फुले, हळदीची पाने, इ.पौराणिक काळातील चित्रांची प्रतिकृती आणि नक्षीकाम यामुळे ही साडी लग्न-समारंभात नेसण्यासाठी उत्तम आहे. सिल्कच्या या साडीवर पारंपारिक दागिने उठून दिसतात.

वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:30 am

Web Title: baluchri saree speciality traditional shravan special designs
Next Stories
1 झोपेचं गणित बिघडलंय? ‘हे’ उपाय करुन पाहा
2 टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त
3 मुलं सारखी गोड खातात? काय कराल?
Just Now!
X