या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद आहेत. पाच दिवस सलग बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवरही पडू शकतो. त्यामुळे बँकेशी संबंधित जी महत्त्वाची कामं असतील ती 25 सप्टेंबरपर्यंतच पूर्ण करा.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. परिणामी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद असतील. तर, 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक लेखा व्यवहारांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे बँकांची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीमुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

आणखी वाचा- …तुमच्या खात्यात दररोज जमा होणार 100 रुपये, RBI चा नवा नियम वाचून खुश व्हाल!

दरम्यान, बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग सुट्ट्यांचे नियोजन करुन २६ आणि २७ सप्टेंबर रोजी जाणीवपुर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.