News Flash

तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पाच दिवस बंद राहणार बँका

लवकर संपवा महत्त्वाची कामं, पाच दिवस बंद राहणार बँकांचं कामकाज

(संग्रहित छायाचित्र)

जर बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या. कारण परवाचा शुक्रवार (दि.१२) वगळता बँका पाच दिवसांसाठी बंद असणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बँकेची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

उद्या गुरूवारी (दि.११) महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.१२) बँका सुरू राहतील, पण नंतर १३ तारखेला दुसरा शनिवार आणि १४ तारखेला रविवार असल्याने बँका पुन्हा बंद असतील.

तर, त्यानंतर १५ आणि १६ तारखेला म्हणजे सोमवार आणि मंगळवारीही बँका बंद असतील. कारण, बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनेने संपाची घोषणा केली आहे. संपामुळे दोन दिवस बँकातील कामकाज बंद असेल. त्यानंतर १७ तारखेला बँका पुन्हा सुरू होतील. त्यामुळे जर बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 11 मार्चआधीच संपवा, नाहीतर ११ मार्च ते १६ मार्च अशा सहा दिवसांमध्ये केवळ एकच दिवस कामकाज सुरु असल्याने बँकांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:14 pm

Web Title: banks will be closed for five days due to bank strike and bank holidays check dates sas 89
Next Stories
1 तब्बल 6000mAh बॅटरी + 48MP क्वॉड रिअर कॅमेरा, ‘मोटोरोला’चा स्वस्त फोन लाँच झाला
2 Vi ने आणले चार जबरदस्त प्लॅन्स, दररोज 3GB डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री Movies
3 Motorola ने भारतात लाँच केले दोन ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 9 हजार 999 रुपयांपासून सुरू
Just Now!
X