16 November 2019

News Flash

आली नवीन ‘इ-स्कूटर’, एकदा चार्ज केल्यास 90 किमीचा प्रवास

जयपूर येथील BattRE या स्टार्टअप कंपनीने देशात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर प्राधान्य दिलं जात आहे, याशिवाय केंद्र सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन आणि सवलती दिल्या जात आहेत. परिणामी जवळपास सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. आता जयपूर येथील BattRE या स्टार्टअप कंपनीने देशात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

पाच रंगांमध्ये ही स्कूटर लाँच करण्यात आली आहे. स्कूटरच्या पुढील एलईडी हेडलाइट आणि मागील बाजूचे टेल लॅम्प व इंडिकेटर्स देखील एलईडी आहेत. राउंड हेडलँप आणि रिअर व्ह्यू मिरर्स स्कूटरला रेट्रो लूक प्राप्त झालंय. याशिवाय स्कूटरमध्ये हँडलबारच्या वरती ब्लॅक फ्लाय स्क्रीन, डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, की-लेस इग्निशन, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टिम आणि युएसबी चार्जर असे फीचर्स आहेत. यातील इंस्ट्रुमेंट कंसोल हा डिजिटल असून याद्वारे बॅटरीचा वापर, स्पीड, टेंपरेचर, ओडोमीटर आणि स्कूटरमध्ये झालेला बिघाड याबाबत माहिती मिळते. या स्कूटरमध्ये 10-इंचाचे अॅलॉय व्हिल्स आणि ट्युबलेस टायर आहेत. 25 किलोमीटर प्रति तास इतका टॉप स्पीड आणि 150mm ग्राउंड क्लिअरंस आहे.

BattRE कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V 30 Ah लिथियम आयर्न बॅटरी पॅकअसून बॅटरीचं वजन 12 किलोग्राम आहे. संपूर्ण स्कूटरचं वजन मात्र केवळ 64 किलोग्राम आहे. पुढील आणि मागील बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आलेत. याशिवाय या स्कूटरमध्ये एक ऑटोमॅटिक कट-ऑफ प्रणाली आहे. यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर आपोआप वीजाचा प्रवाह थांबतो. अद्याप या स्कूटरला नाव देण्यात आलेलं नाहीये मात्र इ-स्कूटर नावाने हिला ओळखलं जात आहे. सध्या ही स्कूटर केवळ, नागपूर, हैदराबाद, अनंतपूर आणि कुरनूल अशा शहरांमध्येच उपलब्ध आहे. पण जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुणे, विशाखापट्टणम आणि वारंगल येथे डिलरशीप आणि सर्विस सेंटर सुरू होतील. यावर्षीच्या अखेरपर्यंत देशभरात किमान 50 डीलरशीप सुरू करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. 63 हजार 555 रुपये इतकी या स्कूटरची किंमत असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 90 किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते असा कंपनीचा दावा आहे.

First Published on June 11, 2019 12:52 pm

Web Title: battre new electric scooter launched know price and specifications sas 89