मुलांशी वागावं कसं.. अनेकवेळा आपण नको तसे वागतो व त्यामुळे मुलांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. मुलांची खूप जास्त स्तुती काहीवेळा त्यांना घातक ठरते. पण याचा अर्थ त्यांची प्रशंसा किंवा स्तुती करूच नये असे नाही. फक्त त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जाईल असे शब्द वापरू  नयेत. विशेषकरून जर तुमच्या मुलांचा आत्मसन्मान जर अगोदरच कमी असेल तर साधारणपणे आपल्याला असे वाटणे साहजिक आहे की, त्याची स्तुती केल्याने तो उल्हसित होईल, पण नवीन संशोधनानुसार तसे होत नाही. जास्त स्तुती केल्याने जास्त आत्मसन्मान असलेली मुले आणखी फुशारून जातात पण कमी आत्मसन्मान असलेल्या मुलांनी अधिक नवनवीन आव्हाने पेलण्यापेक्षा ते आक्रसून जातात व नवी आव्हाने स्वीकारायला तयार होत नाहीत. ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी येथील एडी ब्रुमेलमन यांनी केलेल्या संशोधनानुसार जेव्हा आपण एखाद्या मुलाने केलेल्या कामाला छान केलेस अशी दाद देतो व अविश्वसनीयरित्या छान केलेस (इनक्रेडिबली गुड) असे शब्द वापरतो तेव्हा त्यातील इनक्रेडिबल या विशेषणाने मुले दबून जातात. जास्त आत्मसन्मान असलेली मुले व कमी आत्मसन्मान असलेली मुले यांच्यावर प्रौढ व्यक्तींनी स्तुतीचा वर्षांव केला असता असे दिसून आले की, ज्यांनी सहा वेळा कौतुक केले व २५ टक्के  वेळा अवाजवी स्तुती केली. पहिल्या प्रयोगात ११४ आईवडिलांनी मुलांसह भाग घेतला. त्यात त्यांनी मुलांना गणिताचा अभ्यास देऊन नंतर शाबासकी दिली. दुसऱ्या एका प्रयोगात २४० मुलांनी व्हॅन गॉगचे वाइल्ड रोझेस हे चित्र काढले. त्यातील काहींना जास्त प्रशंसा, काहींना कमी प्रशंसा तर काहींना प्रशंसाच नाही असे प्रतिसाद दिले गेले. यात नंतर असे दिसून आले की, नंतर चित्र काढण्यासाठी निवडताना कमी आत्मसन्मान असलेल्या मुलांनी सोपी चित्रे काढायला घेतली. ज्यांचा आत्मसन्मान अगोदरच जास्त होता ते फुशारून आणखी अवघड चित्रे काढायला घेऊन बसले. याचा अर्थ असा की, कमी आत्मसन्मान असलेली मुले अवाजवी स्तुतीने दबून गेली असे ब्रुमेलमन यांचे मत आहे.