बॉइज वर्ल्ड
तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी महिनाभर दाढी करायची नाही आणि ते वाचलेले पैसे या रुग्णांसाठी द्यायचे ही खरं तर एक मोहीम आहे; पण तिच्या निमित्ताने दाढीच्या वेगवेगळ्या फॅशन करायला निमित्त मिळतं.

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या नावावरूनच अर्थ स्पष्ट होतो. नोव्हेंबर महिन्यात दाढी करायची नाही. ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेण्ड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे. १९९९ साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की, चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी म्हणजेच दाढीसाठी खर्च होणारे पसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे. कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजारांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना पैसे दान करण्याच्या हेतूने ही मोहीम राबवली जाते. चेहऱ्यावरील दाढीचे केस महिन्याभरासाठी वाढू देऊन प्रतीकात्मकरीत्या कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे; पण याची माहिती फार लोकांना नसल्यामुळे सध्या तरी याकडे निव्वळ ट्रेण्ड म्हणूनच बघितलं जातं. गेल्या दोन वर्षांपासून ‘बिअर्ड इज न्यू हॉट’ म्हणजे दाढीधारी पुरुष ही हॉटपणाची नवी व्याख्या आहे असं मानलं जाऊ लागलं आणि त्यामुळेच अनेक दाढीच्या स्टाइल्स बाजारात आल्या. या ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ला स्टायलिशपणे सेलिब्रेट करण्यासाठी काही ट्रेण्डिग दाढी लुक्सची माहिती.

पूर्ण दाढी

हा प्रकार कोणत्याही प्रकारची चेहरेपट्टी असणाऱ्या पुरुषाला शोभून दिसतो. फुल बिअर्ड म्हणजे पुरुषी, खूप राकट असं समजलं जातं. ही जुनी स्टाइल आता पुन्हा आली आहे. यामध्ये दाढी वाढवून तिला योग्य तो आकार दिला जातो. आताच्या काळात बांडोल्झ, गॅरिबाल्डी आणि व्हर्डी असे काही फुल दाढीचे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत.

दाट दाढी

या लुकमध्ये केशरचनादेखील तेवढीच तगडी लागते. कानाचा वरचा भाग ज्याला साइड लॉक म्हटले जाते, तो झिरो मशीनच्या साहाय्याने क्लीन केला जातो. केसांचा वरचा/मधला भाग उभा करून (स्पाइक करून) त्यांचा चंपू केला जातो. गालावर दाट दाढी ठेवली जाते. व्यायाम करणाऱ्या तगडय़ा मुलांना हा लुक सूट होतो. तुम्हाला नुकताच येऊन गेलेला ‘पद्मावत’ सिनेमा आठवतोय? त्यात रणवीर सिंगने साकारलेल्या खिलजी या व्यक्तिरेखेची दाढी याच प्रकारात मोडणारी होती. दाट दाढी म्हणजेच थिक बिअर्डला महाराष्ट्रात किंग लुक म्हणूनही ओळखले जाते. कारण हा लुक जवळपास शिवाजी महाराजांच्या लुकप्रमाणे आहे. आपल्याकडे अनेक शिवप्रेमी मुलं या लुकला आणखी उठाव आणण्यासाठी कपाळावर चंद्रकोरही कोरतात.

लांब दाढी

हा लुक म्हणजे दाढी सरळ लांब वाढू द्यायची. सर्वोत्तम लांब दाढी पूर्ण आणि घट्ट असली पाहिजे. त्यामध्ये कोणतेही पॅच नसावेत. खरं तर हा लुक तरुण मुलं करत नाहीत; पण प्रौढ पुरुषांमध्ये हा लुक फेमस आहे.

लहान दाढी

ही स्टाइल म्हणजे दाट दाढीचाच प्रकार आहे. फक्त यामध्ये चांगला दाढी ट्रिमर वापरून दाट दाढीला आपल्या चेहऱ्यानुसार योग्य तो आकार दिला जातो. अनेकदा ज्यांना दाट दाढी ठेवता येत नाही ते या लुकचा आधार घेतात.

मध्यम दाढी

पूर्ण दाढी आणि आखूड दाढीच्या मधला प्रकार म्हणजे मध्यम दाढी. हा लुक अतिशय फेमस आहे. कारण इंडियन ते वेस्टर्न, कॅज्युअल ते ट्रॅडिशनल अशा कोणत्याही कपडय़ांवर हा लुक सहज कॅरी करता येतो. हा लुक कॉर्पोरेट लुक म्हणूनही ओळखला जातो. हा प्रकार सगळ्याच चेहरेपट्टींना खुलून दिसतो. यामुळे मुलाची हनुवटी उठावदार व्हायला मदत होते.

फिकट दाढी

हा लुक बऱ्यापकी ट्रेण्डमध्ये आहे. कारण हा लुक कॉलेजला जाणारी मुलं ते कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारे अशा सगळ्यांसाठी अतिशय योग्य लुक आहे. यामध्ये दाढी पूर्णपणे काढून न टाकता थोडीशी दिसेल अशी ट्रिम केली जाते. ती निमुळती केली जाते. या लुकमुळे अनेकांची जॉ लाइन छान हायलाइट होते आणि दाढीसकट एक डिसेंट लुकही मिळतो.

खरं तर आता चकाचक दाढी करण्याचा जमाना गेला. फक्त नोहेंबर महिन्यातच दाढी वाढवायची असं अजिबात राहिलेलं नाही. मुलं वर्षभरसुद्धा हा दाढीवाला लुक कॅरी करताना दिसतात. जाड, पातळ अशी कशीही दाढी येत असली तरी तिला आकार देऊन मुलं नवनवीन प्रयोग करताना दिसतात. दाढी ठेवणारा म्हणजे दणकट पुरुष असं समीकरण आपण कितीही नाकारलं तरी आहेच.  दाढी ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. योग्य ती देखभाल, स्वच्छता आणि उत्तम ग्रुिमग करावं लागतं. त्यासाठी बाजारात अनेक प्रकारची तेलं, जेल, वेगवेगळी ट्रिमर उपलब्ध आहेत.
सौजन्य – लोकप्रभा