दोन दिवसांपूर्वीच पोको कंपनीने भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Poco X3 Pro लाँच केला. Poco X3 PRO स्मार्टफोनमध्ये दमदार पर्फॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर आहे. शिवाय फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. Poco X3 PRO मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असून 5160 mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे. 6 एप्रिलपासून या फोनचा सेल सुरू होणार आहे. मात्र, सेलच्या आधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक शानदार ऑफर (अपग्रेड प्रोग्राम) आणली आहे.

या ऑफरअंतर्गत पोको X3 प्रो हा स्मार्टफोन खऱेदी करणाऱ्यांची 7 हजार रुपये बचत होऊ शकते. कंपनीची ही खास ऑफर पोको F1 स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आहे. या ऑफरनुसार पोको F1 एक्स्चेंज केल्यास 7 हजार रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय, फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरुन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे किंवा ईएमआयवर हा फोन खरेदी केल्यास 1 हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटची ऑफरही आहे. म्हणजे पोको X3 प्रो स्मार्टफोनच्या खरेदीवर एकूण 8 हजार रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घेऊया या शानदार स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स :-

Poco X3 Pro स्पेसिफिकेशन्स
Poco X3 Pro मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनही मिळेल. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 640 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तर, अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सेल (अल्ट्रा वाइड), 2 मेगापिक्सेल (मॅक्रो लेन्स) आणि 2 मेगापिक्सेल (डेफ्थ सेन्सर) आहेत. याशिवाय सेल्फीसाठी यात पुढील बाजूला 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Poco X3 Pro ची बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी पोकोच्या या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर असून फोनला वॉटर व डस्टप्रूफसाठी IP53 रेटिंग मिळाली आहे. Poco X3 Pro मध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फिचरही दिलं आहे. या फोनमध्ये 5160mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Poco X3 PRO किंमत :-
Poco X3 PRO हा फोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम अशा दोन प्रकारात आणला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या Poco X3 PRO ची किंमत 18 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये आहे. हा फोन गोल्डन ब्राँझ, ग्रेफाइट ब्लॅक आणि स्टील ब्लू अशा तीन रंगात खरेदी करता येईल. 6 एप्रिलपासून ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्री सुरु होईल.