18 November 2017

News Flash

बीटचा रस घेतल्याने हृदयविकारावर गुणकारी

नव्या संशोधनात आढळले

पीटीआय, टोरोंटो | Updated: May 15, 2017 3:33 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बीटचा रस नियमित घेतल्याने हृदयविकाराचे आजार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होत असल्याचे एका नव्या संशोधनात आढळले आहे.

कॅनडाच्या ग्युलेफ विद्यापीठातील संशोधकांना बीटच्या ज्युसमध्ये आहारासाठी आवश्यक असणारे नायट्रेट आढळून आले. नायट्रेट शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये वाढणारा रक्तदाब कमी करण्याचे कमी करते. तसेच ते हृदयरोगासंबंधित आजार दूर करण्यात मदत करत असल्याचे संशोधकांना आढळून आले.

मज्जसंस्थेमध्ये सक्रियता वाढल्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तसेच रक्तवाहिनीतील आकुंचन यावर नियंत्रण राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. या अभ्यासासाठी वीस तरुणांनी सहभाग घेतला. यामध्ये त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्तदाब, हृदयाचे ठोके, स्नायू आकुंचन तपासण्यात आले.

जे सहभागी तरुण बीटचा रस घेत होते, त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेतमध्ये हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी होत असल्याचे दिसून आले. बीटचा रस शरीरासाठी आरोग्यदायी असून, नियमित ज्युस घेतल्याने त्याचा फायदा होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

 

First Published on May 15, 2017 1:40 am

Web Title: beet juice good for heart