26 November 2020

News Flash

दररोज खा बीट..! विचारही केला नसेल असे होतील फायदे

जाणून घ्या, बीट खाण्याचे फायदे

बऱ्याच वेळा सॅलड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीट आवर्जुन दिलं जातं. अनेकांना बीट मनापासून आवडत नाही. मात्र, बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याप्रमाणेच एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर त्यामध्ये बीटाचा वापर करावा. बीटामुळे पदार्थाला अत्यंत सुंदर रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थदेखील करत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. विशेष म्हणजे नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात.

१. घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घ्यावा.

२. अम्लपित्त, पित्त होणे या समस्या दूर होतात.

३. मूळव्याधीच्या समस्येवर आराम मिळतो.

४.रसक्षयावर आराम मिळतो.

५ थकवा दूर होतो.

६. हातापायांमध्ये ताकद येते.

७. वजन कमी होते.

८. दिर्घकाळचा पांडू विकार बरा होतो.

९. बीटामुळे शरीरातील ताकद वाढते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:05 pm

Web Title: beetroot good for health ssj 93
Next Stories
1 ‘हे’ फायदे वाचून बटाट्याविषयी असलेले सगळे गैरसमज होतील दूर
2 थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे; महागड्या क्रीमची गरज भासणार नाही
3 ‘रिलायन्स रिटेल’चा आणखी एक मोठा करार; GIC करणार ५,५१२ कोटी रुपयांची गुंतवणूक
Just Now!
X