गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणा हा एखादया साथीच्या रोगासारखा झपाटयाने वाढतो आहे. लठ्ठपणामुळे जर पोटाजवळ अतिरिक्त चरबी जमा झाली असेल तर, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, लकवा, हृदयरोग ह्यांचा धोका ५ ते १० पट वाढतो. पुरुषांच्या कमरेचा घेर जर ४० इंचापेक्षा जास्त व स्त्रियांचा ३६ इंचापेक्षा जास्त असेल तर निश्चितपणे दुस-या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता असते .
स्थूल आणि मधुमेहाच्या रुग्णांनी निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम, संतुलित व योग्य आहार, याच्याच बरोबरीने त्यांनी मानसिक ताणदेखील टाळणे गरजेचे आहे. मांड्या आणि पोटाजवळ जमा झालेली अतिरिक्त चरबी जर पुरेसा व्यायाम व आहार नियंत्रण करून सुद्धा कमी होत नसेल तर त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, विनाशस्त्रक्रिया चरबी कमी करणे. लायपोलायसिस व एन्डरमोलोंजी जागतिक दर्जाची व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेली उपचार पद्धती आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन, शस्त्रक्रिया, वेदना, आरक्तपणा ह्याशिवाय त्वरित, म्हणजे एक तासात १ ते ३ इंच चरबी कमी करू शकतात. या उपचार पद्धतीमुळे लठ्ठपणाने होणारे अनारोग्य व आयुष्याला असणारा धोका तर टळतोच पण त्याचबरोबर सुडौल शरीरही प्राप्त होत. त्यामुळे नैराश्य कमी होण्यास उपयोग होतो.