News Flash

जाणून घ्या, दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा धुण्याचे फायदे

सोपे उपाय वापरुन सुंदर दिसण्यास होईल मदत

प्रातिनिधिक छायाचित्र

आपला चेहरा हे आपल्या सौंदर्याचे प्रतिबिंब असते असे आपण अनेकदा ऐकतो. चेहरा उजळ आणि सुंदर दिसण्यासाठी त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काळजी म्हणजे सतत पार्लरमध्ये जाऊन त्याच्यावर विविध उपचारांचा मारा करणे असे नाही तर अगदी सोप्या उपायांनीही आपला चेहरा सुंदर आणि उजळ दिसू शकतो. आपण दिवसभर अनेक ठिकाणी फिरतो तेव्हा आपल्या नकळत याठिकाणी असलेले प्रदूषण थेट आपल्या चेहऱ्यावर बसते. अनेकदा गडबडीत आपण चेहरा धुण्याचे विसरतो. मात्र दिवसातून किमान दोन वेळा तेही फेसवॉशने चेहरा धुणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा तर चांगली राहतेच पण आपल्यालाही फ्रेश वाटते. तुम्हाला रसायने असलेला फेसवॉश वापरायचा नसल्यास तुम्ही चेहरा धुण्यासाठी काही नैसर्गिक पर्यायही निवडू शकता.

त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत – नियमितपणे तुम्ही चेहऱ्याची त्वचा साफ केलीत तर त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. फेसवॉशमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते.

मृत त्वचा निघून जाण्यास मदत – चेहरा धुतल्याने केवळ घाण आणि तेल निघून जाते असे नाही तर चेहऱ्यावरील कोरडे झालेला भाग आणि मृत पेशी निघून जाण्यासही मदत होते. तसेच चेहरा धुण्यासाठी फेसवॉश वापरल्याने चेहरा मऊ आणि तेजस्वी होण्यास मदत होते.

तरुण दिसण्यास मदत – तुम्ही वेळच्या वेळी चेहरा योग्य पद्धतीने धुतल्यास त्यावरील अनावश्यक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा योग्य पद्धतीने श्वास घेऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि तुम्ही नकळत तरुण दिसता.

रक्ताभिसरण क्रिया सुधारते – चेहरा धुताना आपण चेहऱ्यावरुन काही वेळा हात फिरवतो. त्यामुळे याठिकाणच्या पेशी कार्यरत होतात आणि तेथील रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. रक्ताभिसरण चांगले झाल्यास त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:13 pm

Web Title: benefits and importance of washing face with face wash twice a day
Next Stories
1 प्री-बूकिंगआधीच Reliance Jio GigaFiber च्या किंमती झाल्या लिक, जाणून घ्या डिटेल्स
2 सॅमसंगने लॉन्च केला गॅलेक्सी ऑन ८, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
3 iPhone वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! ड्युएल सिम फोन लवकरच दाखल
Just Now!
X