सुक्या मेव्यामध्ये वापरला जाणारा पिस्ता, अक्रोड आणि बदाम हे सर्वांनाच परिचित आहे. हा सुकामेवा योग्य प्रमाणात खाल्ला तर यातील प्रत्येक घटक हे शरीरासाठी फायदेशीर आहेत. तेव्हा आपण सुक्या मेव्यातील बदाम, अक्रोड आणि पिस्त्याचे प्रमुख फायदे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

बदाम
-मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड सेवन केले तर मेंदू बलवान होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते.
– सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात.
– स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे.
– शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात.
– शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

अक्रोड
-मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड सेवन केले तर मेंदू बलवान होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते.
– अक्रोडमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व, प्रथिने, उष्मांक, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात.
– अशक्तपणावर अक्रोड उपयुक्त आहे.
-अक्रोडमुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
– अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारींवर अक्रोडचं तेलही उपयुक्त आहे.
– तसेच अक्रोडचं तेल हे सौंदर्यवर्धकही आहे.

पिस्ता
-पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.
– पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते.
– पिस्त्याच्या सेवनाने जंतूंविरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
– पिस्त्याच्या सेवनाने थकवा, नैराश्य ही लक्षणे जाणवत नाहीत.