एखाद्या चित्रपट किंवा जाहिरातीत अभिनेत्री आणि मॉडेलचे केस पाहून आपलेही केस असे असावेत, असे आपल्यापैकी अनेकांना वाटते. मात्र, काळ्याभोर घनदाट केसांसाठी नेमके काय करावे, हे माहीत नसते. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध शाम्पू आणि कंडिशनर्समध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. या खराब झालेल्या केसांशी आणखी चुकीचे वागतो आणि त्यामुळे केसांचा पोत आणखीनच खराब होतो. अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करुनही केस आपल्याला हवे तसे होत नाहीत. मात्र, केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

कोरफड ही उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. त्वचेचा पोत सुधारण्याबरोबरच केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीतील गरामुळे केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. कोरफड ही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. पाहुयात केसांना कोरफड लावण्याचे नेमके काय फायदे आहेत.

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

नैसर्गिक कंडिशनर

कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी कोरफड अतिशय उपयुक्त असते. कोरफडीतील गर काढून तो पाण्यामध्ये योग्य पद्धतीने एकत्र करावा. हे मिश्रण स्प्रेच्या बाटलीमध्ये टाकावे. यामध्ये तेल मिक्स करावे. हे मिश्रण आवश्यकतेनुसार केसांवर योग्य पद्धतीने स्प्रे करा. असे काही वेळा केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

केसांची उत्तम वाढ

लांब केस सगळ्यांनाच आवडतात. लहान असल्यापासून मुलींना आपले केस लांबसडक असावेत असे वाटत असते. पण आहारातील हरवलेली मूल्ये, प्रदूषण यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते आणि केस तुटण्याचे किंवा गळण्याचे प्रमाण वाढते. या समस्येसाठी कोरफडीची जेल अतिशय उपयुक्त असते. केसांचे आरोग्य टिकविण्यासाठी हा अतिशय उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे. कोरफडीची जेल लावल्याने केस वाढण्यास मदत होते.

केस दिसतात मुलायम

कोरफडीमध्ये मुळातच एक प्रकारचा चिकटपणा असतो. कोरडे आणि प्राण गेलेल्या केसांना वंगण मिळणे आवश्यक असते. तेलामुळे केसांची मुळे बळकट होतात. तर कोरफड लावल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यामुळे चमकदार आणि मुलायम केसांसाठी कोरफडीचा वापर अवश्य करायला हवा.

कोंड्यासाठी उपयुक्त

अनेकांना लहानपणापासून डोक्यात कोंडा होण्याचा त्रास असतो. कोंड्यामुळे डोक्यात खाज येणे, फोड होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. कोरड्या त्वचेमुळे हा त्रास उद्भवतो. केसांची मूळे कमकुवत झाल्यामुळेही कोंडा होतो. अशावेळी कोरफडीचा गर आणि तेल यांचे एकत्रित मिश्रण थोडेसे कोमट करावे. गार झाल्यानंतर हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे. तीन तासांनंतर कोमट पाण्याने केस धुवावेत. याचा कोंडा कमी होण्यास निश्चितच फायदा होतो.