28 September 2020

News Flash

चिमुकल्यासाठी अमृत; स्तनपान केल्याने बाळाला होणारे फायदे

लहान मुलांना होणारे संसर्गजन्य आजार किंवा अन्य संक्रमण दूर राहतात

डॉ. सुरेश बिराजदार

लहान बाळाची वाढ ही आईच्या दुधामुळे होत असते. त्यामुळे बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत त्याला आईचं दूध देण्याचा सल्ला कायम डॉक्टर देत असतात. विशेष म्हणजे लहान बाळाला आईचं दूध पाजल्यामुळे त्याचं पोटचं भरण्यासोबतच त्याची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढत असते. त्यामुळे लहान मुलांना होणारे संसर्गजन्य आजार किंवा अन्य संक्रमण दूर राहतात. आईचे दूध आहारातील उत्तम स्त्रोत आहे ज्यामध्ये प्रथिने, चरबी, लोह, जीवनसत्त्वे यासारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक मूल्यांचा समावेश असतो. त्यामुळे बाळाला स्तनपान करणं गरजेचं आहे. चला तर पाहुयात बाळाला स्तनपान करण्याचे फायदे.

१.आईचे दूध बाळाला अतिसार, श्वसन संसर्गासारख्या आजारांपासून दूर ठेवते.

२. स्तनपानामध्ये पुरेसे लोह असल्याने बाळाला अशक्तपणा येत नाही. पहिले सहा महिने आईचे दूध हे बाळासाठी संपुर्ण पोषण असते. ६ महिन्यांहून अधिक वयोगटातील बाळाकरिता आईच्या दुधासह योग्य घन पदार्थ मिळायला हवे. अशी शिफारस केली जाते की आपल्या बाळासाठी स्तनपान कमीतकमी वयाच्या 2 वर्षापर्यंत चालू ठेवावे.

३. स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते. या एन्टीबॉडीज बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीस सूक्ष्मजंतूपासून बचाव करण्यासाठी चालना देतात आणि आजारांपासून दूर ठेवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावितात.

४. आईच्या दुधात इम्युनोग्लोबीन ए असते. जे बाळाला विविध संर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते.

५..स्तनपान केल्याने आपल्या बाळाला कानाचे संसर्ग, न्यूमोनिया आणि मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.

६.आईचे दूध हे बाळाला रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. प्रथिने, चरबी, शर्करा असे संपूर्ण पोषण हे आईच्या दुधातून मिळते.

७. स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो. त्यामुळे बाळाची बौद्धिक क्षमता ही वाढते.

८. फॉर्म्युला मिल्कपेक्षा आईचे दूध हे बाळाच्या वाढीकरिता सर्वोत्तम ठरते. बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे बाळाच्या पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं तसेच आईचे दूध पचायला हलकं असतं आणि बध्दकोष्ठता होत नाही. त्यामुळे बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

दरम्यान, स्तनपान देणाऱ्या मातेने आपल्या आहारात फ्लॅक्ससीड्स, दही, अंडी, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रथिने तसेच पुरेसे जीवनसत्व, कॅल्शियम, व्हिटामिन डी, लोह, फोलिक एसिड हे महत्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात समावेश असावा तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

(लेखक डॉ. सुरेश बिराजदार हे खारघर येथील मदरहुड रुग्णालयात बालरोग व नवजात शिशुतज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 4:20 pm

Web Title: benefits of breastfeeding for newborn baby ssj 93
Next Stories
1 Yamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक झाली महाग, कंपनीने वाढवली किंमत
2 Tiktok ची नाही भासणार गरज, Instagram ने लाँच केलं शानदार फीचर
3 Xiaomi Independence Day Sale : ‘रेडमी K20 प्रो’वर 4,000 रुपये डिस्काउंट
Just Now!
X