News Flash

पोटदुखीपासून ते अन्नपचन होईपर्यंत ओवा खाण्याचे ७ फायदे

जाणून घ्या, ओवा खाण्याचे गुणकारी फायदे

अचानकपणे पोटात मुरडा आला किंवा पोट दुखू लागलं तर घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर एखादा डाळीच्या पिठापासून पदार्थ तयार करायचा असेल तर स्त्रिया त्यात चिमुटभर ओवा घालतात. त्यामुळे पोटात गॅस धरत नाही. परंतु, ओवा खाल्ल्यामुळे केवळ पोटदुखीच कमी होते असं नाही. ओवा खाण्याचे अन्यही काही फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ओवा खाण्याचे काही गुणकारी फायदे.

१. पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ एकत्र करुन खावे.

२. पोटात आग होत असल्यास किंवा जळजळत असल्यास ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध एकत्र करुन खावं.

३. वारंवार लघवीला होत असल्यास गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशा गोळ्या कराव्यात. या गोळ्या चार-चार तासांनी खाव्यात.

४. लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे.

५. अनेक वेळा दूध पचायला जड जातं. काहींना दूध प्यायल्यावर त्रास होतो. अशांनी दूध प्यायल्यावर चिमूटभर ओवा चावून खावा.

६. ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावे. कारण ओवा उष्ण असल्यामुळे बऱ्यात वेळा तोंड येण्याची शक्यता असते.

७. अनेक वेळा लहान मुलांनी अंथरुणात लघवी करण्याची सवय असते. अशा वेळी किंचितसा ओवा गुळासोबत मुलांना खायला द्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:48 pm

Web Title: benefits of carom seeds ova ssj 93
Next Stories
1 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी, जाणून घ्या Samsung Galaxy M31s चे दमदार फीचर्स
2 Xiaomi ने लाँच केला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी
3 चिनी कंपन्यांविरोधात कारवाई सुरूच, अजून दोन लोकप्रिय चिनी अ‍ॅप्स भारतात ‘बॅन’
Just Now!
X