20 October 2019

News Flash

डिजिटल मेकअपने खुलवा तुमचं सौंदर्य

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या मेकअपला सर्वाधिक प्राधान्य आहे

मेकअप हा शब्द आता सर्वपरिचित झाला आहे. काळानुरुप मेकअप करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. पूर्वी लग्नकार्य किंवा एखाद्या पार्टीमध्ये जाण्यासाठी मेकअप करण्यात येत होता. मात्र आपल्या कामाबरोबरच स्वत:ला प्रेझेंट करणे ही काळाची गरज झाली आहे. तुमच्या राहण्याला आणि दिसण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता तरुणी,स्त्रीया सर्रास मेकअप करताना दिसतात. मेकअप करण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असून सध्या डिजिटल मेकअपला महिला वर्गातून पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या मेकअपला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं पाहायला मिळत आहे. चल तर मग जाणून घेऊयात डिजिटल मेकअपविषयी.

डिजिटल मेकअप म्हणजे काय ?

पार्टी, लग्न-कार्य किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये परफेक्ट लूक देणारा मेकअप म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. या मेकअपचं वैशिष्ट म्हणजे हा मेकअप केल्यानंतर फोटो काढल्यास आपलं सौंदर्य खुलून दिसतं. अनेक वेळा मेकअप करुन फोटो काढल्यानंतर फोटोमध्ये चेहऱ्यावर काही ठिकाणी मेकअपमुळे आलेले पांढरे पॅच किंवा मेकअप भडक रंगाचा दिसतो. मात्र हा मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही पॅच किंवा मेकअपची मात्रा गडद दिसत नाही. उलट मेकअप केल्यानंतर प्रत्यक्षात जो चेहरा दिसतो. अगदी तसाच चेहरा फोटोमध्येही दिसतो. त्याप्रमाणेच हा मेकअप केल्यामुळे वारंवार टचअप करण्याची देखील गरज लागत नाही.

सिलिकाचा वापर –

डिजिटल मेकअप हा सामान्य मेकअप प्रमाणेच केला जातो. मात्र यामध्ये सिलिकाचा वापर केलेला असतो. सिलिकामुळे हा मेकअप आपल्या चेहऱ्यावर योग्य प्रकारे बसतो. त्यासोबतच या मेकअपमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक शाइन किंवा चमक येते. डिजिटल मेकअपमध्ये वापरण्यात येणाऱ्या मेकअप बेस, पावडर, ब्लशर आणि आयशेड्समध्ये सिलिकाची मात्रा असते.

वॉटर प्रुफ असल्यामुळे सर्वाधिक पसंती-

सामान्यत: उन्हाळ्यात मेकअप केल्यानंतर घाम किंवा पाण्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप उतरतो. मेकअप खराब झाल्यामुळे सौंदर्यामध्ये बाधा येते. मात्र डिजिटल मेकअप वॉटरप्रुफ असून तो २४ तास चेहऱ्यावर टिकून राहतो. त्यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा येत नाही.

मेकअप करताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

डिजिटल मेकअप कायम प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टकडूनच करुन घ्यावा.

मेकअप कधीही गडद नसावा. शक्यतो सौम्य मेकअप करावा. त्यामुळे सौंदर्यात अधिक भर पडते.

डिजिटल मेकअपमध्ये डोळे, ओठ यांच्यावर शक्यतो गडद रंगाच्या शेड्स वापराव्यात.

 

First Published on April 23, 2019 1:11 pm

Web Title: benefits of digital makeup in trend