साधारणपणे आंबा, पेरु, चिकू, द्राक्ष या फळांचे फायदे आणि त्याचे शारीरिक गुणधर्म जवळपास साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील आहारात किंवा डाएटमध्ये फळांचा समावेश करा असा सल्ला देतात. मात्र, अशी काही फळे आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला फारसं माहित नाही.परंतु, या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अशाच एका फळाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. उंबर हे साऱ्यांनाच ज्ञात आहे. उंबराच्या झाडालाच औदुंबर असंदेखील म्हटलं जातं. उंबराच्या फळासोबतच त्याच्या पानांमध्ये, सालींमध्ये आणि चिकामध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे उंबराचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. –

१. शरीरावरील सूज कमी करण्यासाठी अल्प प्रमाणात उंबराचा चीक घेऊन त्यात थोडी साखर आणि दूध मिक्स करावे. त्यानंतर या दुधाचं सेवन करावं. शरीरावरील कोणत्याही भागातील सूज कमी होते.

Pune Police Breaks Rule
“पुण्यात सगळे सारखेच”, नियम मोडणाऱ्या पोलिसाला नागरिकाने शिकवला धडा, का व कशी झाली कारवाई, पाहा
President Draupadi Murmu Standing While Giving Bharatratna Award To Lalkrishna Advani
लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”
germany on delhi liquor scam arvind kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, भारताने सुनावले खडेबोल
woman jumped from Atal Setu
दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

२.रक्त वाहते, लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा समस्येवर उंबराचं फळ गुणकारी आहे.

३. रक्ती आव होत असल्यास उंबराच्या चीकाचे १० थेंब दुधासोबत घ्यावे.

४. गालगुंड, गंडमाळा, पू असणाऱ्या जखमा आणि हट्टी सूज यावर उंबराचा चीक लावला असता वेदना व सूज लवकर कमी होते.

५. उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो.

६. मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे यकृतवृद्धी होते. तसंच जलोदर होण्याची भीती असते. अशावेळी बकरीच्या दुधात उंबराची फळे उकडून खाल्ल्यास आराम मिळतो.

७. जळवात, टाचांना फोड येणे, रक्त वाहणे या विकारांत उंबराची फळे वाटून त्याचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे.

८. मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे. सालीचा काढा कदापि करू नये, कारण उष्णतेने त्यातील ज्वरघ्न गुण जातो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)